You are currently viewing सेवापंधरवडा निमित्त उपक्रम यशस्वी करावे -बंड्या नारकर…..

सेवापंधरवडा निमित्त उपक्रम यशस्वी करावे -बंड्या नारकर…..

सेवापंधरवडा निमित्त उपक्रम यशस्वी करावे -बंड्या नारकर…..

भाजपा पडेल मंडळाची सेवा पंधरवडा कार्यशाळा संपन्न.

देवगड

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशतर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा पंधरवडा अभियान’ अंतर्गत पडेल मंडळाची नियोजन कार्यशाळा उत्साहात पार पडली. या अभियानांतर्गत आरोग्य शिबिर, मंडळस्तरीय रक्तदान शिबिर, बूथ स्तरावर स्वच्छता अभियान, ‘एक पेड़ माँ के नाम’ वृक्षारोपण, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त कार्यक्रम आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करावेत, असे आवाहन भाजपाचे तालुकाध्यक्ष बंड्या नारकर यांनी केले. या कार्यशाळेत तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, तालुका सरचिटणीस रवी तिर्लोटकर, रामकृष्ण राणे, अमोल तेली, आरिफ बागदादी, संजय बोबडी, भूषण पोकळे, संजना आळवे, सौ. केळकर, संजय लाड, भूषण बोडस, अंकुश ठुकरुल, राजन लाड, उदय पाटील, कृष्णा धुरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी तालुका स्तरावर आरोग्य शिबिर, बूथ स्तरावर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पांजली, वृक्षारोपण व बूथ कार्यकर्ता बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले. हे सर्व उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन भाजपा पडेल मंडल तालुकाध्यक्ष बंड्या नारकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा