You are currently viewing पावसाळ्यात आपत्ती निवारणासाठी सर्वांनी सतर्क रहावे

पावसाळ्यात आपत्ती निवारणासाठी सर्वांनी सतर्क रहावे

पावसाळ्यात आपत्ती निवारणासाठी सर्वांनी सतर्क रहावे
आमदार नितेश राणेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

देवगड
तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू झाली असून या काळात अनेक ठिकाणी पडझड ,घर गोठे नुकसान अशा संकटांना नागरिकांना तोंड द्यावे लागते यासाठी प्रामुख्याने महसूल प्रशासनाबरोबर आपत्ती व्यवस्थापन कक्ष त्याचबरोबर महाराष्ट्र वीज वितरण कंपनी सार्वजनिक बांधकाम विभाग भारत दूरसंचार निगम व त्याचबरोबर पोलीस प्रशासन व अन्य संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे व आपत्ती काळात निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्याकरता पुरेशी यंत्रणा राबवावी जेणेकरून स्थानिक नागरिकांना या संकटाचा मुकाबला करताना अडचण होता कामा नये अशी सक्त सूचना आमदार नितेश राणे यांनी देवगड येथे आपत्ती व्यवस्थापन समिती बैठकीत बोलताना दिली.यावेळी व्यासपीठावर माजी आमदार ऍड. अजित गोगटे उपनगराध्यक्ष मिताली सावंत,तहसीलदार तथा आयएएस अधिकारी करिष्मा नायर गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जिरगे उपस्थित होते या बैठकीच्या निमित्ताने तहसीलदार करिष्मा नायर यांनी देवगड तालुक्यात आत्तापर्यंत पडलेल्या पर्जन्यवृष्टी बाबत तसेच झालेल्या नुकसानी बाबत सविस्तर अहवाल सादर केला यात प्रामुख्याने तालुक्यात एकूण १८ घर व गोठे यांचे सुमारे ८ लाख २० हजार रुपये एवढी हानी झाली असल्याचे सांगितले .
या बैठकीत आरोग्य विभाग,आढावा घेत असताना तालुक्यातील प्रा.आ.केंद्र,वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी,तसेच औषध साठा ,साथीचे रोग प्रादुर्भाव,उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ उमेश पाटील यांनी दिली.मराराविवी कंपनी ,भारत दूर संचार निगम याना आवश्यक ती काळजी घेण्याबाबत सांगितले.
स्थानिक पातळीवर नगरपंचायत मार्फत नाले सफाई,पाणी शुद्धीकरण या बाबत आढावा घेत असताना देवगड फाटक क्लास नजीक तुंबणारे पावसाचे पाणी व नागरिकांना होणारा त्रास दूर करण्याकरिता सा. बा. खाते,नगरपंचायत प्रशासन यांनी योग्य तो तोडगा काढला असे सांगून अनधिकृत बांधकामामुळे पाण्याचा प्रवाहास अडथळा निर्माण होत असेल तर अतिक्रमण काढून टाकावे.या वेळी माजी आमदार अजित गोगटे यांनी पूर्वापार वहाळ असताना त्यावर अतिक्रमण बांधकाम झाले असल्याचे नमूद करून नगरपंचायत परवानगी देत असताना याकडे दुर्लक्ष होते त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व नागरिकांची समस्या दूर करावी असेही सांगितले.या वेळी एसटी प्रवासी फेऱ्या वेळेत वसुस्थितीत सोडव्या भरधाव वेगाने वाहन हाकणे, थांब्यावर न थांबणे तसेच नांदगाव तिठा येथे सर्व लांब पल्ल्याची अन्य आगाराची प्रवासी फेऱ्या पुलाखाली येत नाहीत त्यामुळे प्रवासी वर्गाची गैरसोय होते त्याकडे रापम प्रशासनाने लक्ष द्यावे असे सूचित केले.
या बैठकीत पोलीस प्रशासन,कृषी खाते,पशुसंवर्धन,अन्य खात्यांचा आढावा घेण्यात आला.या बैठकीला पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे ,सहा. पोलीस निरीक्षक देवरे,बंदर अधिकारी उमेश महाडिक,नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर,कक्ष अधिकारी संतोष बिरजे,बीएसएनएल उपविभागीय अधिकारी कैलास पायमोडे,मराराविवी उपविभागीय अधिकारी एन एम शेख ,कृषी अधिकारी कैलास ढेपे, श्री खराडे,वैद्यकीय अधिक्षक संजय विटकर,उपअभियंता श्री बासूदकर,देवगड आगार व्यवस्था पक निलेश लाड,स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर,उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + 14 =