You are currently viewing रस्त्यांवरील लाईट लावून अंधार केला दूर नवं वर्षाच्या मुहूर्तावर

रस्त्यांवरील लाईट लावून अंधार केला दूर नवं वर्षाच्या मुहूर्तावर

जिल्हा युवक काँग्रेस प्रवक्ते अरविंद मोंडकर यांचा पुढाकार..

मालवण शहरातील अनेक रस्त्यांवर लाईट बंद असतात त्यामुळे शहरातील नागरिकांना व शहरात येणाऱ्या पर्यटकांना देखील याचा त्रास रस्त्यावरून चालताना होत असतो
दोन महिन्यांपूर्वी मालवण युवक काँग्रेस तर्फे अरविंद मोंडकर, बाळू अंधारी, पल्लवी तारी, सरदार ताजर व इतर पदाधिकारी यांनी मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. जिरगे यांस निवेदन देऊन रस्त्यावरील लाईट – पथदीप चालू करा अन्यथा नागरिकांच्या विनंती नुसार आम्ही स्वतः आमच्या प्रयत्नाने या लाईट चालू करून देऊ असा इशारा दिला होता.
त्यावेळी एखादी कायदेशीर बाब निर्माण झाल्यास त्या परीनामाची स्वतः नगरपरिषदेची जबाबदार असेल असे पत्रात म्हटले होते.

परंतु रस्त्यांवरील लाईट बंद अवस्थेत असून अनेकदा नगरपरिषद प्रशासनास कळवून देखील त्यांजवळ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत होते.
याबाबत अनेकदा रस्त्यांवरील काळोखा मुळे शहरातील नागरिकांना त्रास होत असल्याने व नागरिकांच्या विनंतीवरून आज व काल युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते मालवण शहरातील सामाजिक कार्यकर्ते अरविंद मोंडकर यांनी स्व: प्रयत्नांनी

शहरातील फोवकांडा पिंपळ – टोपीवाला हायस्कूल दरम्यान व भरड – ते म्हाडगुत घर दरम्यान च्या पोलांवरील बंद असलेल्या ठिकाणी स्वतः जाऊन लाईट लावून घेतल्या
त्यामुळे तेथील नागरिकांनी देखील मोंडकर यांचे आभार मानले
शहरातील नागरिक घरपट्टी भरत असताना पथदीप कर देखील भारतात
नगरपरिषद हा पथदीप कर नागरिकां जवळून घेत असतानाही रस्त्यांवरील लाईट काही ठिकाणी वर्षभर तर काही ठिकाणी गेले चार चार महिने बंद असतात
त्यामुळे नागरिकांन मध्ये नाराजी असून शहरातील काही भागात लाईट आजही बंद आहेत

नागरिकांच्या विनंतीवरून आम्ही स्वतः त्याठीकानी जाऊन लाईट लावून देणार आहोत.

यावेळी युवक काँग्रेस पदाधिकारी देवानंद लुडबे, गणेश पाडगावकर, योगेश्वर कुरले आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + 17 =