You are currently viewing २३ रोजी शिरोडा येथे नरकासुर स्पर्धेचे आयोजन
In Mala, Panjim

२३ रोजी शिरोडा येथे नरकासुर स्पर्धेचे आयोजन

शिरोडा:

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना गांधी चौक शिरोडा यांच्यावतीने २३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता नरकासुर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ६६६६ रु., द्वितीय ५५५५ रु. ,तृतीय ४४४४ रु.उत्तेजनार्थ १५०० रुपयांची दोन पारितोषिके आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संघानी तात्या गडेकर – ९६७३९२३६३१ यांच्याकडे नावनोंदणी करावी. ही स्पर्धा अ.वि. बावडेकर विद्यालयाच्या पटांगणावर होणार आहे. २४ ऑक्टोंबर रोजी दिवाळी, लक्ष्मीपूजन निमित्ताने श्री सत्यनारायण महापूजा, भजन आदी कार्यक्रम होणार आहेत. रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा