You are currently viewing देवबाग ते तारकर्ली येथे जिओ ट्यूब बंधाऱ्याच्या निकृष्ट कामाची चौकशी होणार….

देवबाग ते तारकर्ली येथे जिओ ट्यूब बंधाऱ्याच्या निकृष्ट कामाची चौकशी होणार….

आमदार वैभव नाईक यांच्या मागणीनुसार ना.अशोक चव्हाण यांचे चौकशीचे आदेश

देवबाग ते तारकर्ली येथे धूप प्रतिबंधक जिओ ट्यूब बंधारा बांधण्याचे काम ठेकेदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असून या कामाची प्रलंबित देयके ठेकेदारास अदा न करता जिओ ट्यूब चे काम दर्जेदार पद्धतीने करण्याच्या सूचना सदर ठेकेदारास देण्यात याव्यात. अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे केली. त्यावर ना. अशोक चव्हाण यांनी सा.बा. विभागाच्या सचिवांना सदर कामाची चौकशी करून पत्रानुसार पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मालवण तालुकयातील देवबाग ते तारकर्ली येथे धूप प्रतिबंधक (जिओ ट्यूब) बंधारा बांधणे हे अत्यंत आवश्यक असणारे काम “४७११ पूर नियंत्रण प्रकल्पावरील भांडवली खर्च ०२ समुद्र धुप प्रतिबंधक प्रकल्प” या लेखाशिर्ष अंतर्गत मंजूर कऱण्यात आले आहे. त्यासाठी एकूण २ कोटी ४५ लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातील एकूण ९७ लक्ष एवढा निधी काम करणाऱ्या ठेकेदारास अदा करण्यात आला आहे. परंतु सध्यस्थितीत ठेकेदाराने केलेल्या कामाचा दर्जा हा अत्यंत निकृष्ट असल्याने शासनाच्या निधीचा अपव्यय होत आहे. याठिकाणी तारकर्ली व देवबाग गावाच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्या कारणाने सदर कामाचा दर्जा हा अंदाजपत्रकाप्रमाणे उत्कृष्ट प्रतीचा असणे आवश्यक आहे. त्यामुळे देवबाग ते तारकर्ली येथे धूप प्रतिबंधक (जिओ ट्यूब) बंधारा बांधणे या कामाचे प्रलंबित देयके ठेकेदारास अदा न करता जिओ ट्यूब चे काम दर्जेदार पद्धतीने करण्याच्या सूचना ठेकेदारास देण्यात याव्यात. अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे केली. त्यावर ना. अशोक चव्हाण यांनी सा.बा. विभागाच्या सचिवांना सदर कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × three =