You are currently viewing इचलकरंजीचे सुपुत्र पत्रकार सागर बाणदार यांच्या पत्रकारितेची 20वर्षाची अभिमानास्पद वाटचाल…

इचलकरंजीचे सुपुत्र पत्रकार सागर बाणदार यांच्या पत्रकारितेची 20वर्षाची अभिमानास्पद वाटचाल…

प्रिंट मेडिया असो की अन्य प्रसार माध्यमं….या सर्वांच काम वस्तुनिष्ठ खरी माहिती देणं,लोक प्रबोधन प्रशिक्षण, समाज शिक्षण करणं, मनोरंजन करणं हे असावं…अशी सर्वसाधारण अपेक्षा असते…

भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाहीदेशात माध्यमांचं मोठं महत्व आहे. त्यामुळं ही माध्यमं टिकली पाहिजेत, त्यांच्या अस्तित्वासाठी निर्भय वातावरण असण्याची गरज आहे.

पत्रकारिता हा काही पैसे मिळविण्याचा, नफा कमावण्याचा धंदा नसतो.पत्रकारांच काम सकळसमाजमनाला शहाणं करणं असलं पाहिजे, समाजाला जागृत करण्याचं व्रत अंगिकारून चांगल काय वाईट काय?याच प्रबोधन पत्रकारांनी आपल्या लेखनातून करत असताना समाजात नेमकं काय सुरु आहे, त्यावर तटस्थ निर्भिड भाष्य करुन दिशा देणंही अपेक्षित असतं. म्हणून पत्रकारितेला व्यवसाय म्हटलं जात नाही तर त्याला पेशा अर्थात व्रत, वसा किंवा सावित्रिचं वाणं म्हंटल जातं…

आपली आर्थिक परिस्थिती कशीही असो…पत्रकारांनी कोणत्याही प्रलोभनाला आमिषाला न बळी पडता किंवा धाकदपटशा इ.प्रभावाखाली न येता प्रवाहाच्या बाजूने वाहत न जाता निर्भिडपणे, सद्सत् विवेक जागृत ठेऊन गोरगरीब बहूजन वंचित पिडित अन्यायग्रस्त यांचा मूकनायक होवून त्यांच्या प्रश्नाना,वाचा फोडण्याचा व समाजातील सत्प्रव्रुत्ती..चांगुलपणा…विधायक सकारात्मकता अधोरेखित करण्याचाही प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे.. हेच व्रत स्वीकारून सागर बाणगार हा आमचा उमद्या व अतिशय तरल संवेदनशील कवी मनाचा तरूण गेली 20वर्षे सतत पत्रकारिता करतो आहे याचा सार्थ अभिमान वाटतो…!!!

आपल्या पत्रकारितेतून त्याने आमच्यासारख्याना सुद्धा नवी दृष्टी दिली आहे.डोळस केलेलं आहे.आपले लेख कविता साहित्य तसेच वाटसअप फेसबुक पोस्ट मधून त्याने अनेक सेवाभावी संस्था…मंडळे…आपत्ती काळात मानवसेवेत,पर्यावरण..क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते व छोटे मोठ उद्योजक…व्यावसाईक…नवोदित कवी लेखक ललित कलांचे उपासक यांच्या कार्याला, सुप्तगुणांना उजाळा देऊन त्याना सर्वदूर प्रसिद्धी देण्याचे सत्कार्य केलेले आहे…
पद्य व गद्य या दोन्ही माध्यमातून अगदी सहजपणे तरलपणे विषय आशय मांडण्याची एक दैवी देणगी सागरला लाभलेली आहे…त्याबद्दल त्याचे करावे तितके कौतूक थोडेच आहे…त्याच्या या लाघवी स्वभावामुळे सागरचा मित्र व चाहता परिवार ही सर्वदूर पोहोचला आहे…तोही दिवसेंदिवस वाढत राहो …तसेच
त्याच्या भावी साहित्यिक व पत्रकारीतेच्या वाटचालीसाठी मनस्वी हार्दिक शुभेच्छा…व मन:पूर्वक अभिनंदन सुद्धा… सागर तुझी पत्रकारिता व साहित्याचा वटव्रुक्ष असाच बहरत जावो..त्याला चंदनाचा सुगंध प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!!!💐💐💐
आपला स्नेहांकित
*प्रा.दिलीप सुतार*
*कुरूंदवाड*

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 6 =