You are currently viewing उद्या शुक्रवार २९ डिसेंबर ला इन्सुली श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव

उद्या शुक्रवार २९ डिसेंबर ला इन्सुली श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव

सावंतवाडी :

 

इन्सुली येथील ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार २९ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त सकाळपासून देवीची ओटी भरणे, नवस बोलणे – फेडणे, केळी ठेवणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होईल. रात्री श्रींची सवाद्य पालखी मिरवणूक, त्यानंतर मध्यरात्री कलेश्वर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन इन्सुली श्री देवी माऊली देवस्थान उपसमिती, मानकरी व ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा