शेतकरी कायद्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर ११ जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी

शेतकरी कायद्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर ११ जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी

 

कृषी कायदे रद्द करण्याच्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) असं म्हटलं आहे की, ‘आम्हाला शेतकर्‍यांची परिस्थिती समजू शकतो. कोर्टाचं हे वक्तव्य अशा वेळी आलं आहे जेव्हा कडाक्याची थंडी व पाऊस असूनही शेतकरी आपल्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. दरम्यान, आपल्या मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांनी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘ट्रॅक्टर मार्च’ काढण्याचा इशाराही दिला आहे.

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन गेल्या दीड महिन्यांपासून सुरू आहे. शेतकरी प्रतिनिधी आणि सरकार यांच्यात चर्चेच्या सात फेऱ्या झाल्या आहेत. परंतु अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. शेतकरी चळवळीदरम्यान सुप्रीम कोर्टातही कृषीविषयक कायद्यांना आव्हान देण्यात आले असून त्यावरील सुनावणी आता ११ जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. तथापि, यासंदर्भात कोर्टाने दिलेल्या टिप्पण्या लक्षात घेण्यासारख्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा