वटपौर्णिमेनिमित्त ऑनलाईन व्याख्यान

वटपौर्णिमेनिमित्त ऑनलाईन व्याख्यान

माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट’ संस्थेचे आयोजन.

वैभववाडी.
दि.२४ जून वटपौर्णिमेनिमित्त ‘माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट’ संस्थेच्यावतीने ‘वटपोर्णिमा : एक पर्यावरणीय उत्सव’ या विषयावर प्रा.सौ.संजीवनी पाटील यांचे ऑनलाईन व्याख्यान संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश भाऊ नारकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केले आहे.
संस्थेच्या वतीने जनजागृती आणि प्रबोधनाच्या दृष्टीने काही विशेष दिनांचे औचित्य साधून पर्यावरण विषयक जागरुकता आणि पर्यावरणपूरक सण-उत्सव साजरे करण्यामागील भूमिका समजावी या उद्देशाने दि.२४ जून रोजी रात्री ठीक आठ ते नऊ या वेळेत गूगल मिट ॲपवर ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. सदर व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी
https://meet.google.com/csc-zysw-djs
या लिंकचा वापर करावा. अधिक माहितीसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश भाऊ नारकर (9168341644) व सचिव प्रा.श्री.एस.एन. पाटील (9834984411) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा