You are currently viewing नीतिमत्तेने जगा व नीतिमत्तेनेच सुखाचा शोध घ्या

नीतिमत्तेने जगा व नीतिमत्तेनेच सुखाचा शोध घ्या

मानसोपचारतज्ञ – डॉ. राजेंद्र बर्वे

सावंतवाडी

श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे मानसशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता आश्र्वासक कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय मानसशास्त्र परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले . याप्रसंगी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज
लखमसावंत भोंसले ,प्रमुख मार्गदर्शक मानसोपचारतज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे, संस्थेचे संचालक प्रा. डी टी देसाई, प्राचार्य डॉ. डी भारमल,मराठी मानसशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. मोहन निंबाळकर , उपाध्यक्ष डॉ.रवींद्र शिंदे,
सचिव डॉ. प्रीतमकुमार बेदरकर , सचिव डॉ. कालिदास पाटील, कार्याध्यक्ष डॉ. दिगंबर दरेकर व डाॅ.गणेश लोखंडे, महाविद्यालयाचे आय क्यु एसी समन्वयक डाॅ. बी एन हिरामणी ,परीषद समन्वयक
प्रा आर बी शिंत्रे, डॉ.कन्नोर, युवराज गहिरराव , तसेच सौ.ललिता बर्वे, परीषद संयोजन समीती सदस्या चैत्राली दळवी, समृद्धी नाटेकर, समीक्षा देसाई, विद्या पाटील, जान्हवी राणे, प्रणव नेमन, प्रा. सौ ठाणेकर , संपूर्ण महाराष्ट्र मधून आलेले 200 सहभागी मानसशास्त्र विषयाचे प्राध्यापक व विद्यार्थी, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे समन्वयक प्रा.आर.बी. शिंत्रे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यानी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
याप्रसंगीचे स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. राजेंद्र शिंत्रे यांचे “प्रगत सामाजिक मानसशास्त्र भाग दोन’, “व्यक्ती भिन्नतेचे मानसशास्त्र” डॉ युवराज गहिराव, “स्थलांतरित मजुरांचे स्वास्थ” डॉ.कन्नूर, “सुखाचे मानसशास्त्र” डॉ. अडसूळ
यांच्या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
उपस्थित पाहुण्यांचा परिचय डॉ.सौ पी जी नाईक यांनी करून दिला.
मुख्य वक्ते डॉ. राजेंद्र बर्वे यांनी “कोविड पश्चात मानसिक स्वास्थ्य आणि आव्हाने ” या विषयावर आपले विचार मांडले. कोविड महामारीनंतर अनेकांचे मानसिक स्वास्थ बिघडलेले आहे.आज आपल्याकडे मानसोपचार तज्ञांची खूप आवश्यकता वाढू लागली आहे. नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. माणसांच्या मनामध्ये अनाकलनीय भीती निर्माण झाली आहे .त्यामुळे जीवनाबद्दल अनिश्चीतता दिसू लागली आहे, लोक सातत्याने नकारात्मक विचार करू लागलेले आहेत.
विद्यार्थी तसेच मुले ज्येष्ठ नागरिक या सर्वांवर कोव्हीड काळातील लॉकडाऊनचा परिणाम झालेला आहे.दुरावलेली नाती जर पूर्ण पदावर आणायचे असतील तर आपण सातत्याने संवाद साधायला हवा वा संवादांमधूनच नात्यांचे पूल बांधले जातील त्यामुळे प्रत्येकाने स्वतःहून नातेसंबंध टिकवायला हवेत. सतत संपर्क संवाद साधायला हवा यातूनच आपला सकारात्मक दृष्टिकोन तयार होईल व जीवन जगण्यासाठी सकारात्मक इच्छा निर्माण होईल. व कुणाच्याही मनामध्ये नकारात्मक भावना येणार नाहीत. आपण नितीमत्तेने जगा व नितीमत्तेनेच सुखाचा शोध घ्या असा मोलाचा सल्ला त्यांनी याप्रसंगी दिला.
सूत्रसंचालन कु. चैत्राली दळवी हिने केले तर आभार प्रा.हर्षद राव यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा