You are currently viewing पोलिसांची भीती दाखवून जबरदस्तीने सुरू असलेली कोरोना टेस्ट थांबवावी – भालचंद्र साठे

पोलिसांची भीती दाखवून जबरदस्तीने सुरू असलेली कोरोना टेस्ट थांबवावी – भालचंद्र साठे

वैभववाडी

जबरदस्तीने सुरु असलेली कोरोना तपासणी नेमकी कशासाठी? शासनाने संबंधित विभागाला टेस्ट चे दैनंदिन टार्गेट दिले आहे का? पोलिसांची भीती दाखवून टेस्टच्या नावाखाली सुरू केलेली धरपकड आरोग्य विभागाने थांबवावी. अन्यथा उद्रेक अटळ आहे असा इशारा भाजपा जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.

गावात कोरोना रुग्ण सापडत आहेत. अशा रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची टेस्ट केलीच पाहिजे. मात्र आरोग्य प्रशासन गावात जाऊन सरसकट टेस्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे चुकीचे आहे. सध्या भात लावणीचा हंगाम सुरु होत आहे. टेस्ट केलेले रिपोर्ट येण्यास पाच ते सहा दिवस लागत आहेत. यात शेतकऱ्यांना मानसिक त्रास होत आहे.

जिल्ह्यात कोलमडलेली आरोग्य यंत्रणा शासनाने अगोदर सुधारावी. बळी जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. कोवीड सेंटर रुग्णांसाठी समस्येचे आगार बनले आहेत. तिथे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. रुग्णांना चांगली सेवा अगोदर द्यावी. शासनाने गावात विलगीकरण सुरू करण्यास भाग पाडले आहे. त्याठिकाणी काही रुग्ण ठेवण्यात आले आहेत. मात्र त्या कक्षात चार- चार दिवस आरोग्याचा कर्मचारी फिरकत नसल्याचे बोलले जात आहे. तिथे दिवसातून एक वेळ तरी आरोग्य अधिकारी, कर्मचार्‍यांनी भेट द्यावी अशी मागणी भालचंद्र साठे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + five =