You are currently viewing १८ मे रोजी मसुरे देऊळवाडा येथे श्री समर्थ बागवे महाराज पुण्यतिथी उत्सव

१८ मे रोजी मसुरे देऊळवाडा येथे श्री समर्थ बागवे महाराज पुण्यतिथी उत्सव

मालवण:

मसुरे देऊळवाडा दत्तवाडी येथे १८ मे रोजी श्री समर्थ बागवे महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

सकाळी ८ ते १० वा. दत्त गुरुंची पूजा अर्चा, सकाळी ११वा. समर्थांच्या समाधीचे पूजन व अभिषेक, दुपारी १२ वा. महाआरती, १ ते ३ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ ते ९ वा. स्थानिकांची सुश्राव्य भजने, रात्रौ ९:३० वा. वालावलकर दशावतार नाट्य कंपनीचा महान नाट्य प्रयोग “राजा हरीश्चंद्र तारामती” होणार आहे. तरी या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × one =