ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, प्रश्न प्राधान्याने मार्गी लावा – आ. नितेश राणे….

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, प्रश्न प्राधान्याने मार्गी लावा – आ. नितेश राणे….

उंबर्डे येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा संपन्न….

वैभववाडी प्रतिनिधी

ऊस शेतीचा तालुका अशी ओळख वैभववाडीची आहे. तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी राणे कुटुंबावर प्रेम करणारे आहेत. विश्वासाच्या नात्यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित झाले आहेत. एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या पाठीशी मी कायम खंबीर उभा आहे. त्या शेतकऱ्यांच्या भावना, समस्या संबंधित यंत्रणेने जाणून घेत त्या सोडविण्याचा प्राधान्याने प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्यापुढे समस्यांचा डोंगर उभा राहील. याची वेळ आणू नका. कारखान्याचा नफा निश्चित वाढला पाहिजे, पण त्याबरोबर शेतकरी जगला पाहिजे. असे प्रतिपादन भाजपा आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.
उंबर्डे येथे वैभववाडी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा मेळावा पार पडला. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जयदीप पाटील, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण, सभापती अक्षता डाफळे, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, कारखाना संचालक प्रभाकर तावडे, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, सुधीर नकाशे, माजी सभापती दिलीप रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, हर्षदा हरयाण, सुरेश सावंत, गटविकास अधिकारी संध्या गमरे, राजा राणे, प्राची तावडे, स्नेहलता चोरगे, शुभांगी पवार, हुसेन लांजेकर, एस. एम. बोबडे, किशोर दळवी, आनंद दळवी, ऊस अधिकारी सुरेश पवार, ऊस संशोधन केंद्राचे प्रतिनिधी विनायक शेट्ये व शेतकरी, भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार नितेश राणे म्हणाले, मेळाव्याचा हेतू कारखाना संबंधित अधिकारी व शेतकरी यांच्यात संवाद व्हावा हा होता. उद्योग म्हटला की अडचणी असतातच पण संवादातून बरेच प्रश्न सुटू शकतात. ऊस शेतकऱ्यांच्या पाठीशी त्यांचा आवाज म्हणून मी कायम उभा आहे. या शेतकऱ्यांच्या व्यथा, प्रश्न पुढे कळविणे ही या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. ते निश्चितच पार पाडतील यावर माझा ठाम विश्वास आहे. पाटील व राणे कुटुंब यांचं नातं अतूट राहिला आहे. राणे साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या त्वरित सोडविल्या जातील. वैभववाडी गट कार्यालय शेतकऱ्यांच्या सोयीच्या ठिकाणी सुरू करा.

चौकट
तालुक्यात ऊस संशोधन केंद्र सुरू होत आहे. ही आनंदाची बाब आहे. मी आमदार जरी असलो तरी हे केंद्र सुरू करण्यासाठी जि.प. सदस्य सुधीर नकाशे यांचे मोठे श्रेय आहे.

काही जण प्रसिद्धीसाठी वक्तव्य करत आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज नाही. ऊस शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व शेतकऱ्यांचा भल्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे राणे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा