You are currently viewing कणकवलीत ४० वर्षावरील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा…

कणकवलीत ४० वर्षावरील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा…

उद्या होणार अंतिम सामना ; ज्येष्ठ खेळाडूंचा होणार सन्मान…!

कणकवली

कणकवली तालुका हौशी क्रिकेट क्लबच्या वतीने ४० वर्षावरील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा कणकवली कॉलेजच्या मैदानात सुरू आहे. या स्पर्धेचे उदघाटन ज्येष्ठ क्रिकेटपट्टू बाबा काझी यांच्या हस्ते झाले.
यावेळी हौशी क्लबचे अध्यक्ष अनिल हळदिवे, तालुका अध्यक्ष राजू पावकसर,जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, क्रिकेटपटू दादा कुडतरकर, बापल धुत्रे, अंकुश निमनकर, राजू पारकर,संजय मालंडकर,माजी नगरसेवक उमेश वाळके,विलास कोरगावकर,किशोर राणे, दादा परब, बंडू गांगण, अभय राणे, सोमा गायकवाड, बीपीन साळवी, अनिल मांजरेकर, शेखर राणे, समीर परब, मोहन तळगावक आदी मान्यवर व खेळाडू, क्रिकेटरसिक उपस्थित होते.
या स्पर्धेत जिल्ह्यातील १६ संघांनी सहभाग घेतला आहे. तसेच उद्या ज्येष्ठ क्रिकेटपटूचा सत्कार अंतिम सामन्यावेळी करण्यात येणार आहे.पहिला सामना कणकवली टाऊन x सनराईज हळवल यांच्या मध्ये खेळण्यात आला. या स्पर्धेचे समालोचन विलास गोलतकर यांनी केले. उद्या रविवारी सायंकाळी ४ वा. अंतिम सामना खेळवला जाणार असून क्रीडारसिक प्रेक्षकांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन हौशी क्रिकेट क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + twelve =