You are currently viewing देवगड, तांबळडेग सागरीमार्ग साकारतोय लोकवर्गणी आणि श्रमदानातून !

देवगड, तांबळडेग सागरीमार्ग साकारतोय लोकवर्गणी आणि श्रमदानातून !

देवगड :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील तांबळडेग गावातील उत्तरवाडा विकास मंडळ ग्रामीण व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता बांधणी करण्यात येत असून त्यासाठी प्रत्येक नागरिकाने बारा फूट जागा देऊन पुरेसे आथिर्क मदत केल्याने झपाट्याने काम चालू आहे. सदर रस्त्यामुळे घरापर्यंत खाजगी वाहन जाऊ शकणार आहे. त्याहीपेक्षा पर्यटकांची वर्दळ वाढू शकेल. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन पुरक व्यवसाय म्हणून पाहणे शक्य होईल.

उत्तरवाडा विकास मंडळ नेहमी असे धाडसी निर्णय घेवून आपली एकी एकजूट कायम आपल्या कामातून दाखवून देत आहेत. या रस्त्याचा फायदा मासळी विक्रेताना होऊ शकणार आहे. घरे बांधण्यासाठी लोकांना रस्ता नसल्याने मुख्य रस्त्यापासून डोईवरून नेआण करावी लागत होती. नवीन रस्ता होत असल्याबद्दल वयोवृद्ध,महिला, विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

आपली कित्येक दिवसांची मागणी श्री देव महापुरुष कृपेने पूर्ण होत असल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे. गाव करेल ते राव काय करील या उक्तीप्रमाणे जेष्ठ नागरिकांसोबत तरुणणाई सहभागी झाली आहे. या अथक परिश्रमाची पचकौशीत चर्चा सुरू असून रस्ता पाहण्यासाठी गर्दी करत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + eight =