You are currently viewing नटीने मनोरंजनच करावे इतर महापुरुषांन बद्दल वक्तव्य करू प्रसिद्धी मिळू नये…! – सौ.सावली पाटकर

नटीने मनोरंजनच करावे इतर महापुरुषांन बद्दल वक्तव्य करू प्रसिद्धी मिळू नये…! – सौ.सावली पाटकर

सावंतवाडी :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आमचे आदरस्थान राष्ट्रीय अध्यक्ष ना.शरद पवार साहेबांची FaceBook व इतर समाज माध्यमातून बदनामी करणाऱ्या मनुवादी केतकी चितळे व जीवे मारण्याच्या धमकी सदृश लिखाण करणाऱ्या निखिल भांबरे व इतर विरुध्द राष्ट्रवादी युवती काँग्रेस सिंधुदुर्ग च्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष सावली पाटकर यांनी केतकी चितळे या अभिनेेत्री या अभिनेत्रीवर परखडपणे टीका केली आहे.

केतकी चितळे विकृतीने या अगोदरही अश्लील विडंबनाचे मनोरंजन करून प्रसिद्धी मिळवली होती. अशा या मनोरंजन करणाऱ्या नटीने आज महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील केंद्रबिंदू असलेल्या पवार साहेबां बद्दल असे वक्तव्य आणि फेसबुकच्या माध्यमातून कवितेचे प्रदर्शन केलेे. या कृत्याला प्रदेशाध्यक्षा सक्षणा ताई सलगर यांनी प्रतिउत्तर दिलेच आहे. त्याचप्रमाणे मुंबई नगरीमध्ये सुद्धा आदितीताई नलावडे यांनी प्रसाद दिलाच आहे. परंतु अशा पद्धतीने यापुढे कुठलाही विकृतीने अशा पद्धतीचा प्रयत्न केल्यास संपूर्ण महाराष्ट्राभर त्यांना युवतींच्या माध्यमातून महाप्रसाद मिळेल. या केतकी चितळे च्या वर्तनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवती राष्ट्रवादी च्या माध्यमातून जाहीर निषेध करत आहोत. तिच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीचे निवेदनही देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा