कुडाळ : तालुक्यातील नेरूर-वाघोसेवाडी येथे ॲटलंस माॅथ नावाचा अतिशय दुर्मीळ पतंग आढळून आला आहे. निसर्ग अभ्यासक रामचंद्र शृंगारे यांना हा भला मोठा पतंग आढळून आला. आशियातील जंगलामध्ये आढळणारा हा एक मोठा सॅचुरनिड पतंग आहे. हा पतंग १२ इंच एवढा मोठा असून पंखाच्या वरचा भाग लालसर तपकिरी रंगाचा आहे. या पतंगाचे आयुर्मान कमी असल्यामुळे हे पतंग दिवसा विश्रांती घेतात आणि रात्री उडतात. हा पतंग दक्षिण भारत व श्रीलंकेत आढळून येतो. मात्र हा पतंग कुडाळ नेरूर गावात आढळून आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधतेमध्ये आणखीन एका नवीन दुर्मिळ प्रजातीची नोंद झाली आहे.
नेरूर येथे आढळला ॲटलंस माॅथ दुर्मिळ पतंग
- Post published:जून 7, 2025
- Post category:कुडाळ / बातम्या / विशेष / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
You Might Also Like
लॉकडाऊन कोरोनामुक्तीचा पर्याय होऊ शकतो का?
तरंदळे गावातील अनेक कार्यकर्त्यांचा बाळासाहेबाची शिवसेना पक्षात प्रवेश
प्रसिद्ध उच्चविद्याविभूषित युवा व्याख्याते व सीमाशुल्क अधिकारी, सत्यवान रेडकर यांचे ४ मे २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विलवडे (बांदा) येथे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान
