*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम गीत रचना*
*प्रार्थनागीत*
देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा
तुझे गुणगान गाऊ करू तुझी सेवा।।
तुझ्या सहवासाची ,लागलीसे आस।
तुझ्या दर्शनाने होई ,हर्ष मज खास।।
तूच माझा प्राणदाता, किती आळवू रे देवा।
तुझे गुणगान गाऊ ,करू तुझी सेवा
आषाढी एकादशीस ,पंढरीची वारी
तूच तारणहार माझा, भक्तजना तारी
नको मज आणिक काही ,हवा दर्शनाचा मेवा
तुझे गुणगान गाऊ , करू तुझी सेवा
व्हावे आयुष्याचेसोने ,हाच चित्ती भाव
तुझ्या दर्शनाची आस ,नाही दुजी माव
धाव सख्या पांडुरंगा, अंत नको पाहू देवा
तुझे गुणगान गाऊ करू तुझी सेवा!
प्रतिभा पिटके
अमरावती