You are currently viewing जन.जगन्नाथराव भोसले उद्यान येथे रंगणार “सांज पाडवा”

जन.जगन्नाथराव भोसले उद्यान येथे रंगणार “सांज पाडवा”

*हिंदी मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम*

 

*मान.नाम.दीपक केसरकर मित्र मंडळाचे आयोजन*

 

दिवाळीचे औचित्य साधून सावंतवाडी येथील जन.जगन्नाथराव भोसले उद्यान येथे मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठीक 6.30 वाजता हिंदी मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम “सांज पाडवा” रंगणार आहे. मान. नाम.दीपक केसरकर मित्रमंडळ तर्फे गेली दोन वर्षे “सांज पाडवा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून यावर्षी देखील नाम.दीपक केसरकर मित्र मंडळाने सावंतवाडीकरांसाठी अनोखा असा कार्यक्रम आयोजित करून पाडव्याची संध्याकाळ रमणीय करण्याचे ठरविले आहे.

पाडव्याच्या मुहूर्तावर “स्वर निनाद” प्रस्तुत “सत्यम शिवम सुंदरम” हा हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम पार पडणार असून यामध्ये नामांकित गायकांना ऐकण्याची संधी सावंतवाडीकर जनतेला मिळणार आहे. सदर कार्यक्रमाचा आस्वाद सर्व सावंतवाडीकर जनतेने घ्यावा असे आवाहन नाम.दीपक केसरकर मित्रमंडळाने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 4 =