खरेदी दरपत्रकासाठी संपर्क साधावा

खरेदी दरपत्रकासाठी संपर्क साधावा

सिंधुदुर्गनगरी

व्हीडीओ व छायाचित्र कॅमेरा आणि अनुषंगिक सहसाहित्य खरेदीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी या कार्लायलायशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले आहे.

            जिल्हा माहिती कार्यालयाला व्हीडीओ चित्रीकरणाचे एडिटींग करण्यासाठी संगणक, सॉफ्टवेअर, हार्डडिस्क, 2 लॅपटॉप, 2 एलईडी स्मार्ट टीव्ही आणि छायाचित्र कॅमेरा तसेच व्हीडीओ कॅमेरा आदी साहित्य खरेदी करण्याचे आहे. त्यासाठी दरपत्रके मागविण्यात येणार आहेत. इच्छुकांनी जिल्हा माहिती कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक 02362-228859, 228684, ई-मेल diosindhudurg@gmail.com येथे संपर्क साधून आपले नाव, संपर्क क्रमांक, पत्ता याविषयीची माहिती सादर करावी. जेणेकरून दरपत्रक मागणीपत्र देण्यासाठी सोयीस्कर होईल. ही खरेदी प्रक्रिया कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचे अधिकार जिल्हा माहिती कार्यालय आपल्याकडे राखून ठेवत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा