You are currently viewing बॅ. नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट ची स्थापना समाजासाठी मंतरलेला जन्मोत्सव ठरावा : अरुण दाभोळकर

बॅ. नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट ची स्थापना समाजासाठी मंतरलेला जन्मोत्सव ठरावा : अरुण दाभोळकर

कुडाळ :

“सुखदुःखाची गाथा लिहिण्यासाठी अडथळ्यांची मालिका पार करावी लागते. या पाश्र्वभूमीवर बॅ. नाथ पै फाऊंडेशन फॉर डेव्हलपमेंट समाजासाठी मंतरलेला जन्मोत्सव ठरावा. या फाऊंडेशन मार्फत अखील मानवजातीसाठी काम व्हावे. त्यासाठी कामाचा श्रीगणेशा असा करा की सर्व देवता हितचिंतकांमार्फत मदत करायला उभ्या राहतील”. असे उद्गार सुप्रसिद्ध चित्रकार अरुण दाभोळकर यांनी काढले.

ते बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये “बॅरिस्टर नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकणच्या नामफलकाचे विधिवत अनावरण करताना बोलत होते.त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “नाथ पै यांचे अपूर्ण राहिलेले काम या फाऊंडेशनच्या रूपाने पूर्ण करा. कोकणी जनता आपल्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे. असे सांगत फाऊंडेशन रूपी पाण्याच्या दवबिंदू चे मोठ्या जलाशयात रूपांतर होऊ द्या. जेणेकरून तो सर्वांची तहान तृप्त करू शकत असे कार्य करा .असे शुभ आशीर्वाद देत शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर फाऊंडेशनच्या अध्यक्षा आदिती पै, त्यांचे वडील शैलेंद्र पै, भाऊ अद्वैत पै व नाथ पै प्रेमी भूपत सावंत, सचिन वालावलकर, मालवण येथील बॅ.नाथ पै सेवांगणचे संचालक श्री.लक्ष्मिकांत खोबरेकर, नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य मीना जोशी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली व उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

शैलेन्द्र पै यांनी आपल्या मनोगतामध्ये “नाथ पै यांचे अपूर्ण राहिलेले समाजकार्य आपल्यापरीने पूर्ण करण्याचा या फाऊंडेशन तर्फे आम्ही नक्कीच प्रयत्न करू. या फाऊंडेशनच्या निमित्ताने आपण समाजासाठी भरीव काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी आपले प्रेम व सदिच्छ आमच्या पाठीशी असू द्यात. असे सांगितले. अदिती पै यांनीही आपल्या मनोगतामध्ये “नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त काहीतरी लक्षवेधी कार्य करावे असे वाटल्याने आपण “बॅरिस्टर नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट ट्रस्ट”ची स्थापना करीत असल्याचे सांगत नाथ पै यांच्या स्मृतीला उजाळा देत त्यांना अभिप्रेत असलेले कार्य आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत; नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन गाळवणकर यांचे या कामी मोठे सहकार्य लाभले आहे. पुढेही लाभेल. हे सांगत आपल्या सर्वांच्या सदिच्छांचे पाठबळ लाभले तर नाथ पै यांचे अपूर्ण राहिलेले कार्य नक्कीच पूर्ण होण्यास हे फाऊंडेशन नक्कीच यशस्वी होईल. अशी अपेक्षा व्यक्त केली. . उमेश गाळवणकर यांनी आपल्या मनोगतामध्ये “या फाऊंडेशनला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देत; त्यांचे विचार जागवत त्यांच्या नावाला कुठे बाधा येणार नाही अशी खबरदारी आपली संस्था नक्कीच घेईल .असे अभिवचन दिले.

*विशेष म्हणजे फाऊंडेशन च्या सामाजिक कार्याचा शुभारंभ १८ फेब्रुवारी २०२२ रोजी विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये नाथ पै यांच्या जन्मगावी बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या पुढाकाराने व बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालय, बॅ.नाथ फिजिओथेरपी कॉलेज व बॅ. नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे मोफत आरोग्य शिबिराच्या आयोजनातून करण्यात आला. मालवण येथील नाथ पै सेवांगण चे संचालक श्री लक्ष्मीकांत खोबरेकर यांनीसुद्धा “नाथ पै यांच्या स्मृती संजीवीत करण्याचा प्रयत्न या ट्रस्टमार्फत नक्कीच केला जाईल. अशी अपेक्षा व्यक्त करीत नाथ पै यांच्या कार्याचा लौकिक सर्वदूर पसरला जाईल . असा आशावाद व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी बी.एड.कॉलेजचे प्राचार्य परेश धावडे, नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी, प्रा वैशाली ओटवणेकर, संस्थेच्या सीईओ अमृता गाळवणकर, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अरुण मर्गज यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा