You are currently viewing वाहतूक समस्या,अपु-या गटारींबाबत त्वरित कार्यवाही करा –

वाहतूक समस्या,अपु-या गटारींबाबत त्वरित कार्यवाही करा –

इनाम संघटनेची महापालिकेकडे निवेदनाद्वारे मागणी

इचलकरंजी : प्रतिनिधी

इचलकरंजी शहरातील विविध मुलभूत नागरी समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी , याबाबत इनाम संघटनेच्या वतीने महापालिकेचे
प्रभारी उपायुक्त केतन गुजर यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की ,
इचलकरंजी शहरातील पंचवटी टॉकीज ते तीन बत्ती चार रस्ता चौक आणि थोरात चौक ते कापड मार्केट व राजीव गांधी भवन परिसरात मुख्य रस्त्यावर ट्रक लावलेले असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघात होत असतात. त्यामुळे इचलकरंजी शहराच्या वस्त्रोद्योगाच्या दृष्टीने ट्रक पार्किंगसाठी इतरत्र सोय करावी , ट्रक टर्मिनलसाठी तातडीने प्रयत्न करून वाहतूक कोंडी सोडवावी.मंगळवार व शुक्रवार आठवडा बाजारावेळी आवाडे टॉकीजसमोरून अवजड वाहतूक बंद करून रिंग रोड मार्गे करण्यात यावी.सुतार मळा येथे सुरु असलेले डांबरीकरण काम अतिशय निकृष्ट व अपूर्ण असून त्याची चौकशी करण्यात यावी.सांगली रस्ता डिपीला दाखवल्याप्रमाणे मोठा व्हावा ही नागरिकांची मागणी असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी नाहीत. त्याची तातडीने कार्यवाही झाल्यास पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी घुसते ते थांबेल. बिशप इंग्लिश स्कूल ते आरगे भवन रोड या परिसरात अपूर्ण गटार केली आहे. सदर गटार कोणत्या मक्तेदाराने केली आहे , तसेच तेथील इंजिनियर कोण याची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी.वंदे मातरम क्रीडांगण समोरील बाजूस शाळा असल्याने वाहतूक जास्त आहे. सदर भागात स्पीडब्रेकर करण्याची मागणी वारंवार झालेली असून सदर भागात प्लास्टिक स्पीडब्रेकर बसविण्यात यावेत.राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ कंपाऊंडमध्ये नागरिक रात्री खाद्यपदार्थ खाऊन कचरा करतात.तेथे सुरक्षारक्षक नेमून स्वच्छतेची दक्षता घेण्यात यावी.
याबाबत प्रभारी उपायुक्त
केतन गुजर यांनी तात्काळ कार्यवाही करण्यात येईल , असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
यावेळी इनामचे राजू कोन्नुर,राम आडकी,उदयसिंह निंबाळकर,संजय डाके,महेंद्र जाधव,लक्ष्मण पाटील,दीपक अग्रवाल,डॉ.सुप्रिया माने,कल्पना माळी, अभिजित पटवा आदी उपस्थित होते.

 

*संवाद मिडिया*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*
*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*🏭यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏭*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *💯 नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक

*उपलब्ध कोर्सेस*👇

🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिंग
🔹 कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*📖प्रमुख वैशिष्ट्ये📖*

*❇️3 वर्षांचा अभ्यासक्रम📖*
*❇️अनुभवी व तज्ञ प्राध्यापक🕺🏼*
*❇️उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
*❇️उत्तम निकालाची परंपरा🤷‍♂️*
*❇️नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार*🤝
*❇️💯 नोकरीची हमी👍🏻*
❇️ *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शासकीय फी सवलत💸*
🆓 *SC/ST* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण🆓*
*🚌बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…📝*

*भेट द्या –👇🏻*
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, ता.सावंतवाडी*
*जि. सिंधुदुर्ग*
*www.sybespolytechnic.com*
*संपर्क -*
*☎️02363273535/273456*
*📲मोबा.9404598060*

*आमची प्रवेश केंद्रे -:*

*कुडाळ प्रवेश केंद्र*
माने-जी क्रिएशन, पीएनबी बँकेजवळ, कुडाळ, ता.कुडाळ
9403053303 / 9403163639

*माणगाव प्रवेश केंद्र*
कदम कॉम्प्लेक्स, हायस्कूल रोड, माणगाव तिठा, माणगाव, ता.कुडाळ
9421718850 / 9158510198

*वेंगुर्ला प्रवेश केंद्र*
हायटेक कॉम्प्युटर, जि प शाळा नंबर 3 जवळ, वेंगुर्ला, ता.वेंगुर्ला
9403101880 / 8879433307/ 9964056383

*मळेवाड प्रवेश केंद्र*
श्री गणेश मंदिराजवळ, मळेवाड तिठा, मळेवाड, ता.सावंतवाडी
9422810151 / 9175017071

*दोडामार्ग प्रवेश केंद्र*
शॉप नं.4, टोपले कॉम्प्लेक्स, बॉम्बे टेक्सटाईलच्या मागे, बाजारपेठ दोडामार्ग, ता.दोडामार्ग
9130003477 / 9145705988 / 9405990211

*Advt Link*
https://sanwadmedia.com/98446/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा