वैभववाडी भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन…

वैभववाडी भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन…

दार उघड उध्दवा दार उघड अशी कार्यकर्त्यांची हाक…

लाँकडाऊन काळात बंद असलेली मंदिरे व इतर धार्मिक स्थळे तात्काळ खुली करा. या मागणीसाठी वैभववाडी भाजपच्यावतीने गावागावात घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपा कार्यकर्त्यांनी दार उघड उद्धवा दार उघड, अशी हाक दिली.

तालुक्यातील कुसुर, तिथवली, उंबर्डे, कोकिसरे तसेच इतर गावात कार्यकर्त्यांनी शनिवारी घंटानाद आंदोलन केले. या आंदोलनात वैभववाडी भाजपा अध्यक्ष, सभापती, नगराध्यक्ष, कार्यकारणी सदस्य, पं. स. व जि. प. सदस्य, नगरसेवक, सरपंच, शक्तीप्रमुख बुथप्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा