You are currently viewing व्हिडीओ काॅन्फरन्सिंग अ‍ॅप ‘गूगल मीट’ संदर्भात गूगलचा मोठा निर्णय…

व्हिडीओ काॅन्फरन्सिंग अ‍ॅप ‘गूगल मीट’ संदर्भात गूगलचा मोठा निर्णय…

वृत्तसंस्था

गूगलने आपल्या व्हिडीओ काॅन्फरन्सिंग अ‍ॅप संदर्भात मोठी घोषणी केली आहे. गूगलने म्हटले आहे की, गूगल मीट(Google Meet) या अ‍ॅपची मोफत सेवा लवकरच बंद होणार आहे. 30 सप्टेंबर 2020 नंतर, गूगल मीट (Google Meet) केवळ 60 मिनिटांसाठी विनामूल्य सेवा देईल. मात्र यानंतर सेवा वापरायची असेल तर शुल्क मोजावे लागणार आहे. 30 सप्टेंबर नंतर, गूगलच्या सेवांचे नियम बदलणार आहे. हे नवीन नियम गूगलच्या जी सूट आणि जी एज्युकेशनच्या दोन्ही सेवांनाही लागू होणार आहेत.

जी सूट व्हिडीओ काॅन्फरन्सिंग अंतर्गत एकाच वेळी 250 जण सहभागी होऊ शकत होते. तर एकाच वेळी एक लाख जण हे टेलिकास्ट लाईव्ह पाहू शकत होते.

तसेच ही मीटिंग रेकॉर्ड करुन यासंदर्भातील माहिती गूगल ड्राईव्हवरही सेव्ह करण्याची सुविधा विनाशुल्क उपलब्ध होती. आधी ही सेवा विनाशुल्क होती. पण, आता नवीन अपडेटनुसार आता जी सूटसाठी महिन्याला 25 डॉलर म्हणजेच 1800 रुपये शुल्क मोजावे लागणार आहे.

विशेष म्हणजे, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जगभरात व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅप आणि अशा वेबसाईटचा वापर वाढल्याचे चित्र दिसत आहे. सुरुवातीला, झूम अ‍ॅप लोक मोठ्या प्रमाणात वापरत होते. त्यानंतर झूम अ‍ॅपची वाढती लोकप्रियता पाहता गूगलनेसुद्धा गूगल मीट (Google Meet) नावाचे व्हिडोओ अ‍ॅप नवीन अपडेटसह बाजारात आणले.

यापूर्वी गूगल मीट(Google Meet) चा वापर फक्त जीसूट यूजर्स करू शकत होते. पण नंतर ही सेवा सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली. त्यानंतर फक्त 50 दिवसात गूगल मीट(Google Meet) डाउनलोड करणाऱ्यांची संख्या दुप्पटीने वाढली.

अ‍ॅप ट्रफिक ट्रॅक करणाऱ्या एपब्रेन या साईटने दिलेल्या माहितीनुसार, 17 मे 2020 पर्यंत गूगल मीट (Google Meet) हे अ‍ॅप डाउनलोड करणाऱ्यांची संख्या 5 कोटी होती. जी, 7 जुलैपर्यंत 10 कोटींच्याही पुढे गेली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 3 =