You are currently viewing सामाजिक कार्याच्या अनुभवामुळेच शहर अध्यक्षपदी अजय गोंदावळे…

सामाजिक कार्याच्या अनुभवामुळेच शहर अध्यक्षपदी अजय गोंदावळे…

त्यांच्यात काम करण्याची ऊर्मी; नगराध्यक्ष संजू परब

सावंतवाडी
भाजप सावंतवाडी शहर अध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक होते, सामाजिक कार्याच्या अनुभवामुळेच अजय गोंदावळे यांच्यावर शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्यात काम करण्याची ऊर्मी आहे. निश्चितच ते पक्षाची ताकद वाढविणार आहेत. येत्या वर्षभरात होणाऱ्या पालिका निवडणुकीत भाजपचे कमळ शहरात पुन्हा फुलणार आहे, असा विश्वास नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला.

भाजप सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षपदी अजय गोंदावळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सावंतवाडी शहर भाजप व नगरपालिकेच्या वतीने गोंदावळे यांचा शाल व श्रीफळ देऊन नगराध्यक्षांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, राजू बेग, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते दादा मालवणकर, श्याम केनवडेकर, दिपाली भालेकर, सरोज कुडतरकर, धनश्री गावकर उपस्थित होत्या.
सत्काराला उत्तर देताना गोंदावळे म्हणाले, जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना वाढीसाठी अपेक्षित काम करणार असल्याचे स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three − 1 =