You are currently viewing एओर्टिक स्टेनोसिसवर ओपन सर्जरी करून ७१ वर्षीय रुग्णाला दिले जीवदान

एओर्टिक स्टेनोसिसवर ओपन सर्जरी करून ७१ वर्षीय रुग्णाला दिले जीवदान

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

महाधमनी वाॅल्व्हच्या आजारांचा वृद्धापकाळ आणि तीव्र हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाशी सुस्थापित संबंध आहे. हृदयातील कोणताही भाग रोगग्रस्त होऊ शकतो, परंतु महाधमनी झडप सर्वात जास्त प्रभावित होते. एओर्टिक स्टेनोसिस (एएस) हे हृदयातील झडपांपैकी एकाचे प्रतिबंधित उघडणे आहे. यामुळे श्वास घेण्यात अडचण येणे, चक्कर येणे आणि अचानक हृदयविकाराने मृत्यू होऊ शकतो. अशीच एक केस वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल येथे सुगंधा जाधव, ७१ वर्षांच्या रुग्णाच्या बाबतीत दिसून आली. रूग्णाला नियमित कामकाजा दरम्यान श्वासोच्छवासाची लक्षणे दिसून आली. त्यांना ब्रोन्कियल अस्थमा आणि जुन्या टीबीच्या पार्श्वभूमीवर टाइप-२ श्वसन निकामी झाल्याचे निदान झाले. इकोकार्डियोग्राम गंभीर एओर्टिक स्टेनोसिस (एएस) आणि गंभीर डाव्या वेंट्रिक्युलर डिसफंक्शन (इ एफ – १५%) चे सूचक होते. गंभीर अशा एओर्टिक स्टेनोसिससाठी उपचार पर्याय म्हणजे सर्जिकल रिप्लेसमेंट (ओपन हार्ट सर्जरी) किंवा ट्रान्सकॅथेटर ऑर्टिक वाॅल्व्ह इम्प्लांटेशन (TAVI). रुग्णाचे वय आणि इतर कॉमोरबिडीटी लक्षात घेऊन तावीचा सल्ला देण्यात आला. तावी ही एक प्रगत प्रक्रिया आहे ज्यामध्ये शस्त्रक्रियेशिवाय अरुंद वाॅल्व्ह बदलला जातो. परंतु रुग्णाने ओपन हार्ट सर्जरीचा पर्याय निवडला.

डॉ. गुलशन रोहरा-कार्डिओथोरॅसिक सर्जन, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल ह्यांनी सांगितले की, श्रीमती जाधव यांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया हा एक धोक्याचा घटक होता कारण त्यांचे वजन (अ) ३२ किलो, (ब) वय ७१ वर्षे, (क) क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह फुफ्फुसाचा रोग (ब्रोन्कियल दमा), (ड) पीएफटी वर गंभीर अपरिवर्तनीय प्रतिबंधात्मक फुफ्फुसाचा रोग, (इ) गंभीर एलवी डिसफंक्शन (ईएफ-१५©)

जीवाला धोका २०% होता आणि दीर्घकाळापर्यंत वेंटिलेशनचा धोका ६७% होता याचा अर्थ ५ पैकी १ रुग्ण ओपन हार्ट सर्जरीमध्ये दगावतो.

डॉ. गुलशन रोहरा पुढे म्हणाले, “आम्ही त्यांना पहिले अनुकूल असे वातावरण तयार केले आणि त्यांना ओपन हार्ट सर्जरीसाठी नेण्यापूर्वी २ आठवडे काळजीपूर्वक नियोजन केले. शस्त्रक्रियेदरम्यान, त्यांचे कमी वजन आणि शरीर रचना लक्षात घेऊन रोगग्रस्त वाॅल्व्ह बदलणे हे सर्वात मोठे आव्हान होते परंतु डॉक्टरांच्या चांगल्या टीममुळे कोणतीही गुंतागुंत न होता शस्त्रक्रिया चांगली झाली. पुढील ४८ तासांत त्या व्हेंटिलेटर बंद करून नाश्ता करत होत्या. पुढील काही दिवसांत, आम्ही त्यांना फुफ्फुस आणि शारीरिक पुनर्वसनासाठी मदत केली. त्या आता फॉलोअपमध्ये आहे आणि त्या चांगला प्रतिसाद देत आहेत.”

श्रीमती जाधव यांच्या म्हणण्यानुसार, “मला अत्यंत नाजूक अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल येथील इंटर्नल मेडिसिन डॉ. हनी सावला यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर मला संपूर्ण शरीर तपासणीचा सल्ला देण्यात आला. अहवालात हृदयातील काही विकृती दर्शविल्या गेल्या होत्या, त्यानंतर मला डॉ. गुलशन रोहरा, कार्डिओथोरॅसिक सर्जन, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल यांना भेटण्याची शिफारस करण्यात आली, ज्यांनी समस्या आणि शस्त्रक्रियेतील जोखमींबद्दल आम्हांला चांगला सल्ला दिला. मला तात्काळ औषधोपचार करण्यात आले आणि आम्हाला (एएस) प्रक्रियेवर विचार करण्यासाठी वेळ देण्यात आला. डॉक्टरांवरील माझा विश्वास आणि माझ्या मुलांसाठी अधिक काळ जगण्याची माझी इच्छा यामुळे माझ्या भीतीवर मात केली गेली आणि आज मी सामान्य आहे आणि माझ्या मुलांसह एक अद्भुत जीवन जगत आहे. वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल येथील प्रत्येक व्यक्तीचे मी माझ्या उपचारादरम्यान दाखवलेल्या काळजी,आणि प्रेमाबद्दल आभार मानते.”

 

प्रतिक्रिया व्यक्त करा