You are currently viewing माझी सिमला टूर

माझी सिमला टूर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अमोल देशपांडे लिखित अप्रतिम लेख*

*माझी सिमला टूर*

आठवण म्हणजे खोलवर मनाच्या कुपीत दडवून ठेवलेला मोतीच जणू!
कुपी उघडली आणि त्या मोत्याच्या प्रकाशाने जीवन पुन्हा एकदा उजळले.
आठवण करणे म्हणजे काय, तर तो प्रसंग, तो काळ पुन्हा एकदा जगणे!
असो, ऑफिस मधील कामाच्या धबडग्याने बरेच दिवस इच्छा असूनही काही लिहू शकलो नाही. त्यात मी एक नंबरचा विसराळू( हे माझ्या पत्नीचे लाडके मत!)
पण आज अचानक मनातल्या अनेक वावटळी वर उठू लागल्या.
त्यातलीच एक आपल्यासाठी पेश करतोय.

पाच सहा वर्षांपूर्वी सिमला कुलू मनाली ला गेलो होतो.
एजंटचा मागील ट्रीप मधे वाईट अनुभव आल्याने या वेळेस मी स्वतःच पॅकेज बुक केले. Advance ही दिला.
पण या क्षेत्रात मी किती नवखा होतो त्याची प्रचिती सिमला विमानतळावर उतरल्या बरोब्बर झाली!
आम्हाला घ्यायला गाडीच नव्हती!
बुकिंग कंपनीला फोन केल्यावर, तिकडून गोड आवाजात “सर आप तो चंडीगढ एअरपोर्टसे आनेवाले थे ना सsssर? आणि इकडून कडक आवाजात, ” कुठलं बुकींग केलंय तेही विसरलात?, धन्य आहे बाई तुमची!
शेवटी बुकींग इटरनरी काढून दाखवली तेव्हा कुठे बाऊन्सर चा मारा थांबला!
बुकींग कंपनीच्या नावानं बोटं मोडत हॉटेल गाठले, रिसेप्शनिस्टच्या मदतीने गाडी बुक केली आणि छानपैकी चार दिवस सिमला फिरलो
आमच्या धरमिंदर नावाच्या ड्रायव्हरने मनालीला सोडून दिले!
मनालीला एक मराठी कुटुंब भेटले त्यांच्यासोबत फिरलो
आम्हाला आता परत सिमल्याला जायचे होते.
मी विचार केला अर्धी टूर तर झालीच आहे, आता तरी बुकींग कंपनीची गाडी मागवावी. आश्चर्य म्हणजे ते बुकींगवाले ही तयार झाले लगेच गाडी आली इतकी लहान गाडी पाहून आम्ही काहीसे हिरमुसलो पण जाऊ द्या जाऊ कसेतरी म्हणून अर्धे सामान डिकीत अर्धे मांडीवर घेऊन बसलो कसेतरी!
ड्रायव्हर जणू आम्ही त्याच्या आजोबांकडून आम्ही कर्ज घेतले होते आणि अजून फेडले नाही अशा अविर्भावात आमच्याशी वागत होता.
एका पेट्रोल पंपावर आमच्याच पैशांनी पेट्रोल भरल्यानंतर त्याने एका शॉल फॅक्टरी पाशी गाडी थांबवली आजूबाजूला जंगल आणि ते एकमेव दुकान! आम्ही काहीसे मनाविरुद्धच उतरलो,
दुकानात एक चक्कर मारून बाहेर येऊन पाहतो तो काय
आमचे सामान बाहेर काढून ड्रायव्हर गाडी घेऊन पसार झाला होता!
अ‍ॅडव्हान्स गेला, पेट्रोल चे पैसे गेले, संध्याकाळ ची वेळ …..
आता या भयाण होत चाललेल्या जंगलात काय होणार आपले?

*माझी सिमला टूर -भाग २*
तर त्या वेड्या, विक्षिप्त ड्रायव्हरने आम्हाला त्या भयाण जंगलात सोडून दिले.
संध्याकाळचे पाच वाजत होते.
शॉल फॅक्टरी बंद होण्याची वेळ झाली होती. ती सर्व नोकर मंडळी आपापल्या टू व्हीलर्सनी आली होती.
त्यांनी आम्हाला धीर दिला. “देखिए सर, थोडी देरमे बस आयेगी उसमे आप लोग पक्का चढ जाईये, उसके बाद रातभर कुछ नहीं मिलेगा”।
आम्ही आपल्या माना डोलावल्या आणि रस्त्याच्या कडेला एका बेंचवर बसलो.
बर्‍याच कार्स जात होत्या पण साऱ्या मनालीहूनच भरुन येत होत्या.

हळूहळू अंधार दाटत चालला होता. आता ड्रायव्हरला शिव्या मोजून झाल्या होत्या आणि बस नाही आली तर…. अशी शंका कुरतडू लागली.
तेवढ्यात दुरुन बस दिसली. आम्ही देवाचे आभार मानले आणि सामान रस्त्यावर घेऊन आलो.
बस जवळ आली, बस मध्ये उभं रहायलाही जागा नव्हती. कंडक्टरने दारही न उघडता पुन्हा बेल मारली आणि बस चक्क निघून गेली…

आता काय?

अंधार वाढत चाललेला, आजूबाजूला डिस्कव्हरी वर बघतो तसे जंगल, रातकिड्यांचा आवाज, त्या क्षणी वाटत होते ही आयुष्यातील ही शेवटची रात्र!
अशावेळी आठवतो तो देव!
आम्ही आमचे दोघांचेही आराध्य दैवत श्री गजानन महाराजांचा धावा करत बसलो.
कार्स येत होत्या आणि जात होत्या अचानक एक कार पुढे जाऊन थांबली.
मी पळतच कार जवळ गेलो.
कार रिकामी होती.
मी ड्रायव्हरला म्हटले,” भैया शिमला तक चलोगे?
हाँं बाबूजी क्यूँ नही? आईये, बैठिये।”
त्या क्षणी त्या ड्रायव्हरने माझी अख्खी प्रॉपर्टी मागितली असती तर मी द्यायला तयार होतो!

आम्ही सामान गाडीत भरले आणि बसलो. गाडी निघाली.
एका डोंगराळ रस्त्यावर एक ढाबा दिसत होता. ड्रायव्हरने रात्री सात वाजता गाडी थांबवली “साब कुछ खा लेंगे?” तो म्हणाला.
“नही भाई, हमे कुछ नही चाहिये पहिले सिमला चलो”
मी आपला आग्रह करत होतो.
ड्रायव्हर म्हणाला “साब मै सिर्फ चाय पी लेता हूँ। आप भी खाना खा लीजिए!”
आता हा नाराज होऊ नये म्हणून केवळ आम्ही उतरलो. हॉटेलमध्ये जाऊन बसून राहिलो. मी सारखा बाहेर येऊन बघत होतो गाडीतले सामान तर बाहेर नाही ठेवलेले?
कसेतरी दहा मिनिटे थांबून आम्ही गाडीत येऊन बसलो.
ड्रायव्हर आला. त्यानंतरचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडला. त्याने तेवढेच पैसे मागितले जेवढे आम्ही आधीच्या ड्रायव्हरला देणार होतो.

गजानन महाराजांचे साक्षात्कार मला याआधीही अनुभवास आले पण हा अनुभव विरळाच!

*अमोल देशपांडे*

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 5 =