You are currently viewing दिवसाला खडा मारणारे अधिकारी बाहेर पडा
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

दिवसाला खडा मारणारे अधिकारी बाहेर पडा

*भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे यांचा लेख*

**दिवसाला खडा मारणारे अधिकारी बाहेर पडा**

रेशनकार्ड सर्कल चौकशी आॅफिस मधून नाही जनतेच्या दारातून झाली पाहिजे असा शासन निर्णय मा मुख्यमंत्री. यांनी द्यावा त्याशिवाय हे कामचुकार अधिकार कामाला लागणार नाहीत
गोरगरिबांना हक्काचा घास मिळावा यासाठी रेशन ही संकल्पना अमलात आली. त्यासाठी त्या कुटुंबाला रेशनकार्ड काढणे गरजेचे करण्यात आले. त्यासाठी आधारकार्ड. सवताचे घर. भारतीय नागरिक पुरावा. नाव वाढविण्यासाठी नाव कमी केल्याचा दाखला. भांडे पट्टा करार भाड्याने राहतं असेलतर. विभक्त रेशन दुकानदार दाखला. उत्पन्न दाखला तहसिलदार किंवा तलाठी. आणि या सर्व बाबींसाठी महत्वाचे असतें ते म्हणजे प्रत्येक माहिती सत्य आहे मी कोणाच्याही कोणत्याही दबावात माहिती देत नाही असं प्रतिज्ञापत्र.
आणि हे सर्व सत्य आहे याची चौकशी करण्याचा अधिकार आहे तो म्हणजे सर्कल अधिकारी पण या अधिकारी व कर्मचारी यांनी या सर्व प्रकियेचा बाजार मांडला आहे. सर्कल चौकशी होत असताना तलाठी यांनी दिलेला उत्पन्न दाखला ग्राह्य धरला जात नाही त्यावेळी त्यांना तहसिलदार यांच्या सहि केलेला उत्पन्न दाखला लागतो तो कशासाठी ??? आपल्या गोरगरीब लोकांना नाहक त्रास देण्यास आणि काय पैसा निघतोय कां बघण्यासाठी बरोबर आहे कां ?? नविन रेशनकार्ड काढण्यासाठी अर्ज करणार्या व्यक्तिने माझं महाराष्ट्रात कोठेही रेशनकार्ड नाही माझं कोठेही रेशनकार्ड मध्ये नावं नाही सदर नाव कमी अथवा वाढविण्यासाठी अर्ज करणारी व्यक्ती एकच आहे . मी दिलेली माहिती बरोबर आहे त्यातील कोणतीही माहिती खोटी आढळल्यास माझ्यावर होणा-या शासकीय कारवाई साठी मी पात्र आहे यासाठी एकच प्रमाणपत्र ग्राह्य कां धरलं जातं नाही ?? कारणं सेतू कार्यालय. झेरॉक्स. आणि शासनाला रद्दी गोळा करण्यासाठी कागद पाहीजेत म्हणून एकच प्रमाणपत्र चालतं नसावं?? कार्यालयात गोळा होणारी कागदपत्रांची रद्दी अधिकारी व कर्मचारी विकतात काय ??
महाराष्ट्र शासन नागरि पुरवठा सनद नुसार भारतीय नागरिक आहे. त्यांच्याकडं आधारकार्ड आहे. मग तो एकटा असेल. गंभीर आजाराने ग्रस्त असेल. आदिवासी. एकट्या राहणाऱ्या विधवा. ६० वर्षा वरिल वयोवृद्ध लोक. भुमीहीन शेतकरी. अल्पभूधारक. ग्रामीण कारागीर. कु़भार. चांभार.मोची. विणकर. सुतार. झोपडपट्टी रहिवासी. हमाल. मालवाहक. असंघटित कामगार. सायकल रिक्षा चालक. फळें फुले विकणारे. गारुडी. कचरा गोळा करणारे. एच आय व्हि बाधित रुग्ण. एवढेच काय पण रस्त्यावर भिक मागणारा भिकारी . समजा एखादे कुटुंब किंवा महिला रागाने आपले घर मुलाबाळांना घेऊन घर सोडून परजिल्ह्यात राहत असेलतर तीला सुध्दा रेशनकार्ड देण्यास आरोपी सारखी चौकशी कशासाठी ?? नेते आमदार खासदार मंत्री नगरसेवक यांचे बगलबच्चे चावडीतील अधिकारी व कर्मचारी यांना नुसता फोन केला तरी कान कापल्या कुत्रयाप्रमाणे हात बांधून उभे राहतात कायरे ईमान विकल काय ?? पण गोरगरीब लोकांना शिधापत्रिका देताना एवढी चौकशी कशासाठी गोरगरीब यांना सुध्दा तात्पुरती शिधापत्रिका देणें बंधनकारक आहे आणि सर्कल तलाठी यांना तसा आदेश शासनाने दिला आहे पण अधिकारी व कर्मचारी यांना आपले आॅफिस सोडायचं नाही आणि दाखल करणारे यांचें काम बिना पैशांचे करायचे नाही ???
रेशनकार्ड सर्कल चौकशी करणारे यांनी नविन रेशनकार्ड काढण्यासाठी ठराव दाखल करणारे यांच्या घरी जाऊन काय परस्थिती आहे लोक किती. घर सवताचे आहे कि भाड्याचे. घरांत लहान मुले किती. वयोवृद्ध किती. कमावती लोक किती. हा सर्व लेखाजोखा सर्कल चौकशी अर्जावर दाखल करावा आॅफिस मध्ये माझा तुझा करुन तयार करण्यात आलेला सर्कल चौकशी अहवाल ग्राह्य धरण्यात येऊ नये हा सर्व प्रकार अधिकारी व कर्मचारी यांचा गलथानपणा म्हणून अशा अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या घराचा रस्ता दाखवण्यात यावा कारण यांना अधिकारी म्हणून घ्यावा लाज कशी वाटत नाही ??
नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज
अर्ज कुटुंबातील ज्येष्ठ स्त्री कुटुंब प्रमुख म्हणून तिच्या नावे अर्ज
अर्जदार कुटुंबप्रमुख स्त्रीचे दोन फोटो त्यावर अर्जदाराची सही
आधार कार्डची प्रत किंवा आधार कार्ड नोंदणीची पावतीची साक्षांकित झेरॉक्स प्रत
नवीन शिधापत्रिका अर्जासोबत पूर्वीच्या शिधा पत्रकातील नाव कमी केल्याबाबतचा दाखला जोडणे आवश्यक आहे आणि जर तो दाखला नसेल, मूळ ठिकाणचे तहसीलदार यांचा नाव नसलेबाबतचा दाखला
पत्त्याचा आणि जागेच्या पुराव्यासाठी स्वतःच्या घराचे विज बिल किंवा चालू वर्षाची उत्पन्नाचा दाखला. तसेच घर भाड्याने असल्यास, घर मालकाचे संमतीपत्र व त्याचे नावे असलेले वीज बिल किंवा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.
दुबार रेशन कार्ड मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
शिधापत्रिकेची दुय्यम प्रत मिळणेकरिता अर्ज
जर तुमचे रेशन कार्ड हरवले असले आणि तुम्हाला नवीन रेशन कार्ड हवे असले, तर त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे खालील प्रमाणे असतील.
रेशन कार्ड हरवल्याबाबत पोलीसांचा दाखला
दुकानदारा कडील रेशन कार्ड चालू असल्याबाबतचा सही व शिक्का असणारा दाखला
अर्जासोबत ओळखपत्र पुरावा
कार्ड खुप जुने झाले असले व त्यावरील अक्षरे ही पुसट असतील, तर साध्या कागदावरील स्वघोषणापत्र आवश्यक आहे.
रेशन कार्ड जीर्ण झाले असेल, तर मूळ जीर्ण कार्डवर दुकानदाराची सही व शिक्का असणे आवश्यक आहे.
रेशन कार्ड मध्ये नाव वाढवायचे असेल तर काय करावे?
युनिटमध्ये वाढ करणेबाबत अर्ज
लहान मुलांचे नाव वाढवण्यासाठी मुलांचे जन्माचे दाखले आणि शाळेतील बोनाफाईड दाखल्यांची साक्षांकित प्रत
मोठ्या व्यक्तीचे नाव वाढवण्यासाठी पूर्वीच्या कार्डातून नाव कमी केले बाबतचा दाखला
पत्नीचे नाव वाढवण्यासाठी माहेरच्या कार्डातून नाव कमी केल्या बाबत तहसिलदार किंवा परिमंडळ अधिकारी यांचा दाखला तसेच लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
रेशन कार्ड मधील नाव कमी करायचे असल्यास काय करावे?
युनिट कमी करणे(नाव वगळणे) बाबत अर्ज
परगावी राहण्यास जात असल्यास पहिले मूळ कार्ड आणि नाव कमी करण्याचा अर्ज
मयत असल्यास मयत दाखला
मुलीचे लग्न झाले असल्यास लग्नपत्रिका जोडून नाव कमी करण्याचा अर्ज भरावा.
या अर्जासोबत ओळखपत्र पुरावा जोडणे आवश्यक आहे.
रेशन कार्ड अर्ज भरल्यापासून किती दिवसात मिळेल?
दुबार रेशन कार्ड मिळण्यासाठी ८ दिवसाचा कालावधी लागेल
नवीन रेशन कार्ड मिळण्यासाठी १ महिन्याचा कालावधी लागेल
चालू रेशन कार्ड मधील नावात बदल व युनिट मध्ये वाढ अथवा घट केल्यास रेशन कार्ड परत मिळण्यासाठी ३ दिवसाचा कालावधी लागेल.
शासकीय अधिकारी कर्मचारी यांना त्यांचे कर्तव्य पार पाडतांना,कर्मचाऱ्यांचे वर्तन कसे असावे. यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा(वर्तणूक) नियम 1979 मध्ये काही तरतुदी केल्या आहेत. कार्यालयीन कामकाज किंवा कर्तव्य बजावितांना प्रशासकीय,लेखाविषयक व तांत्रिक स्वरुपाचे नियम,मार्गदर्शक तत्वे निर्माण केलेले आहेत. या नियमांचा भंग झाल्यास अशी कृती गैरवर्तन ठरविली जाते. व यामुळे शिस्त भंगाची कारवाईस सामोरे जावे लागते. अधिकारी कर्मचारी यांचे अशा प्रकारचे अनुचित स्वरुपाचे गैरवर्तन दखलपात्र असते. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम-1979, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम-1979  व विभागीय चौकशी नियम पुस्तीका चौथी आवृत्ती 1991 यानुसार नियमानुसार विभागीय चौकशी केली जाते. शासकीय  कामकाज करतांना किंवा कर्तव्य  बजवितांना प्रशासकीय नियम, मार्गदर्शक तत्वे यांचा भंग झाल्यास अशी कृती गैरवर्तनात मोडते. गैरवर्तन घडल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाते. यामध्ये विभागीय चौकशीचा सासेमेरा लागतो. या कारवाईस खातेनिहाय चौकशी असेही म्हणतात.
मंडल निरीक्षकाने, तलाठ्याने ठेवलेल्या सर्व गाव नमुन्यांची तपासणी करावी व तलाठी अचूक मागणी करतो, जमीन महसूल देण्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींकडून ती वसूल करतो, वसुलीचे हिशेब योग्य रीतीने व अचूक ठेवतो व सामान्य प्रशासनाला आवश्यक असलेली माहिती अचूकपणे गोळा करतो याची खात्री करून घ्यावी.
मंडल निरीक्षक किंवा मंडळ अधिकारी उर्फ सर्कल भाऊसाहेब हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे.
मंडल अधिकारी यांनी सादर करावयाचे अहवाल वरीष्ठ कार्यालयाकडुन मंडल अधिकारी यांच्याकडुन अनेक प्रकारचे अहवाल मागविले जातात. बर्‍याचदा अनेक मंडल अधिकारी हे अपुर्ण माहितीचा, स्वंयस्पष्ट असा अहवाल सादर करीत नाहीत. याला अनेक कारणे असु शकतात, त्यापैकीच एक कारण म्हणजे अहवाल कसा असावा याबाबत मंडल अधिकारी यांचे प्रशिक्षण किंवा माहिती यांना दिली जात नाही. त्यामुळेच अनेकदा चुका होतात. त्यामुळे खालील लेख हा मंडल अधिकारी यांनी वेगवेगळ्या विषयावरील अहवाल बनवताना तो कसा बनवावा, कोणत्या बाबींचा त्यात समावेश असावा, कोणत्या बाबींचा समावेश नसावा आणि काही महत्वाचे अहवालाचे नमुने अवलोकनासाठी व निव्वळ माहितीसाठी सोबत जोडले आहेत. तसेच तलाठी दफ्तराची कपाटात रचना कशी असावी, तलाठी दफ्तराची अभिलेख जतनाची वर्गवारी कशी आहे याबाबत खालील लेखामध्ये सविस्तरपणे मांडणी केलेली आहे.
प्रतिज्ञापत्र हा एक कायदेशीर कागद आहे जो साक्षीदाराला शपथेखाली बांधतो, एखाद्या व्यक्तीने दिलेली विधाने सत्य मानतो आणि सिव्हिल प्रोसिजर कोडच्या ऑर्डर 19 च्या नियम 3 अंतर्गत घटनेचे पालन करतो . प्रतिज्ञापत्राची सामग्री एखाद्या व्यक्तीचे वैयक्तिक ज्ञान प्रतिबिंबित करते, त्याद्वारे, त्यांना दाखल करताना माहिती नसलेली माहिती समाविष्ट करण्यात अयशस्वी होण्यासाठी जबाबदार धरले जाऊ शकत नाही. हे अत्यावश्यक आहे की शपथपत्र स्पष्टपणे आणि अचूकपणे वस्तुस्थिती दर्शवते आणि ज्याने शपथ दिली आहे अशा सॉलिसिटर, नोटरी पब्लिक किंवा न्यायिक अधिकाऱ्याच्या उपस्थितीत त्यावर स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. पुरावा कायद्याच्या कलम ३ अन्वये, जर न्यायालयाकडे पुरेशी कारणे असतील, जसे की प्रतिपक्षाला उलटतपासणीसाठी उपस्थित करण्याचा अधिकार, प्रतिज्ञापत्र हा पुरावा असू शकतो. कोणत्याही वेळी व्यक्तीला माहिती सामायिक करण्यास किंवा कायद्याच्या न्यायालयात साक्ष देण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही.
भारतात प्रतिज्ञापत्राचा सामान्य वापर
नाव बदलण्याचे प्रतिज्ञापत्र
लग्नासाठी संयुक्त शपथपत्र
नवजात बाळासाठी प्रतिज्ञापत्र
स्वाक्षरी बदलण्यासाठी प्रतिज्ञापत्र
पत्त्याचा पुरावा प्रतिज्ञापत्र
उत्पन्नाचा पुरावा प्रतिज्ञापत्र
कर्ज करारासाठी प्रतिज्ञापत्र
भाडे करारासाठी प्रतिज्ञापत्र
कायदेशीर नोटीस जारी करण्यासाठी प्रतिज्ञापत्र
मृत्यू प्रमाणपत्रासाठी प्रतिज्ञापत्र
इस्टेट नियोजनासाठी प्रतिज्ञापत्र
वरिल जेवढी प्रमाणपत्रे तुम्ही वाचली त्यात रेशनकार्ड साठी कुठंही प्रतिज्ञापत्र करा असा उल्लेख नाही. आत्ता आपण खरोखर एक माणूस आहे यासाठी सुध्दा आपणांस प्रतिज्ञापत्र करायला हे अधिकारी लावतील एवढेच मुर्दाड आहेत हे अधिकारी. आपणं एखादे प्रकरण घेऊन यांचेकडे गेलो असता तो अधिकारी कागदपत्रे अशी टाकतो की ती कागदपत्रे काढण्यासाठी जवळचे पैसे घातले आहेत म्हणजे आपल्या पदांचा आणि सत्तेचा उत आला आहे यांना यांची जागा दाखविण्याची गरज आहे मला याचा अनुभव आला आहे.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

Advertisement

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

प्रतिक्रिया व्यक्त करा