You are currently viewing राजहंस फौंडेशनच्या ज्ञान संस्कार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

राजहंस फौंडेशनच्या ज्ञान संस्कार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

विविध कला – गुणांच्या सादरीकरणातून शिबिराची सांगता

इचलकरंजी / प्रतिनिधी

दैनंदिन जीवनात व्यक्तीमत्व विकासासाठी ध्यानधारणा,योगा , प्रार्थना,मंञ , नामस्मरण व त्यासोबतच विविध खेळाचे महत्व
पटवून देत चिमुकल्यांच्या मनावर चांगले संस्कार करण्याची धडपड
एका वेगळ्या आनंदाची अनुभूती देणारी ठरली.निमित्त होते राजहंस फौंडेशन व हुतात्मा बाबू गेनू विद्या मंदिर क्रमांक २८ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सात दिवसीय ज्ञान संस्कार शिबिराचे.रविवारी या शिबिराची सांगता भक्तीगीत , बोधकथा , नृत्य अशा कार्यक्रमाने व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.

येथील राजहंस फौंडेशनच्या
डॉ.प्रतिभा पैलवान व त्यांचे सर्व सहकारी हे समाजातील अनाथ , निराधार व गरीब मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध माध्यमातून कार्यरत आहेत.याशिवाय तृतीय पंथीयांना समाजामध्ये विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबरोबरच त्यांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जातात. कामगार ,कष्टकरी वर्गाच्या मुलांवर वेळीच चांगले संस्कार होऊन ते सक्षम बनवावेत ,याच उदात्त हेतूने राजहंस फौंडेशन व हुतात्मा बाबू गेनू विद्या मंदिर क्रमांक २८ यांच्या संयुक्त विद्यमाने जुना चंदूर रोड दुर्गामाता मंदिर जवळ असलेल्या हुतात्मा बाबू गेनू विद्या मंदिर पटांगणात
सात दिवसीय ज्ञान संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिर काळात मुलांना प्रार्थना,मंञ , नामजप,खेळ , व्यायाम,गायन ,अभिनय व विविध कला याचे महत्व विविध उदाहरणांव्दारे प्रशिक्षकांनी पटवून दिले.तसेच
चांगल्या सवयी,आई – वडील व गुरुजनांचा आदर ,सर्वांशी प्रेमभाव कसा जपायचा याचे देखील प्रात्यक्षिकातून धडे देण्यात आले.त्यामुळे हे शिबिर लहान मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी उपयुक्त ठरल्याचे मुलांमधील चांगला बदल पाहून दिसून आले.नुकतीच या शिबिराची सांगता तासगावचे प्रसिद्ध व्याख्याते संजय काळे ,उपमहाराष्ट्र केसरी पै.अमृत भोसले , हुतात्मा बाबू गेनू विद्या मंदिरचे मुख्याध्यापक नारायण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी संजय काळे यांनी विविध अभंगांचे उत्कृष्ट गायन करत वातावरण भक्तीरसाने भारावून टाकले.तसेच मुखात देवाचे नाव घेऊन काम करणे ,आई – वडीलांची सेवा ,थोरा – मोठ्यांचा आदर म्हणजेच खरी देवाची पूजा हे विविध उदाहरणांव्दारे मुलांना पटवून दिले.यावेळी ॲड.आरती खड्ड यांनी ओंकार स्वरुपा हे भक्तीगीत तर समर्थ
या अंध मुलाने भक्तीगीत व नृत्य सादर करत या कार्यक्रमाची आणखी शोभा वाढवली‌.यावेळी उपमहाराष्ट्र केसरी पै.अमृत भोसले , मुख्याध्यापक नारायण पाटील व विविध मान्यवरांच्या हस्ते मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी मान्यवरांनी या शिबिराच्या माध्यमातून मुलांना मिळालेले संस्कार हे निश्चितच त्यांचे व्यक्तिमत्व सुधारुण त्यांना चांगला माणूस घडवतील,असा विश्वास व्यक्त केला.तसेच शिबिर संयोजिका राजहंस फौंडेशनच्या प्रमुख
डॉ.प्रतिभा पैलवान यांच्या नि:स्पृह सामाजिक कार्याचे कौतुक करुन भविष्यात या कार्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करु ,अशी ग्वाही दिली.
यावेळी पञकार सागर बाणदार व राजहंस फौंडेशनच्या संचालिका सौ. सुनिता पाटील यांनीही मुलांच्या कला – गुणांचे कौतुक करुन त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिबिरासाठी अथक परिश्रम घेतलेल्या प्रशिक्षिका वैष्णवी सोनटक्के, लक्ष्मी कोटगी ,मिनल पाटील, गौरी भाटले यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रतिष्ठित नागरिक
किरण पाटील , हुतात्मा बाबू गेनू विद्या मंदिरच्या शिक्षिका सौ.सुवर्णा पाटील,शिक्षक राजाराम लोंढे यांच्यासह मुले ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 8 =