You are currently viewing स्वामी समर्थ समग्र दर्शन सोहळ्याचे सावंतवाडीत १५ रोजी आयोजन

स्वामी समर्थ समग्र दर्शन सोहळ्याचे सावंतवाडीत १५ रोजी आयोजन

सावंतवाडी

श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या विविधांगी दर्शनासाठी श्रीस्वामी समर्थ समग्र दर्शन हा सोहळा सावंतवाडीमध्ये श्रीविठ्ठल मंदिरात योजिला आहे . श्रीस्वामी समर्थ गुरुरायांच्या १४ अस्सल प्रतिमा, त्यांच्या २५ चरणपादुकांचे फोटोरूपी सुस्पष्ट संपूर्ण दर्शन, त्यांच्या ३५ शिष्योत्तमांचे, श्रीस्वामीस्पर्शित दूर्मीळ असंख्य वस्तूंचे, तसेच अक्कलकोटमधील श्रीस्वामीलीलास्थळांचे भावस्पर्शी १२५ फोटो असे दर्शन सोहळ्याचे स्वरूप असणार आहे.परब्रह्ममूर्ती श्रीस्वामी समर्थ श्रीगुरुंच्या प्रत्यक्ष वास्तव्यामुळे तळकोकणचा अवघा परिसर परमपावन ठरला आहे. त्या श्रीस्वामीवैभवाचे तसेच तळकोकणातील ठिकठिकाणच्या श्रीस्वामीकार्याचेही छायाचित्ररूपी दर्शन या कार्यक्रमामध्ये होणार आहे.दि. १५ ला हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता सुरु होईल. रात्री ८ वाजेपर्यंत दर्शन चालू राहिल. १६ एप्रिल २०२३ ला सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत दर्शन घेता येईल. या कार्यक्रमास सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − eight =