भोई केरवडेचे बाळू ठाकूर एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व…..

भोई केरवडेचे बाळू ठाकूर एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व…..

भोईचे केरवडे गावचे श्री बाळू ठाकूर म्हणजे खरोखर परमेश्वराने पृथ्वीवर पाठवलेला एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होय. कुठचीही कला ही अगोदर रक्तात असली पाहिजे. त्याशिवाय त्याला देवपण येत नसत, ही म्हण खरोखर तंतोतंत जुळते ती बाळू ठाकूर यांना. याअगोदर त्यांनी काष्ठशिल्पकला सर्वाना दाखवून सिंधुदुर्ग नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात व गोवा प्रांतातही आपल्या कलेचा आगळा वेगळा कलाप्रकार दाखवून लॉकडावून काळात सर्वाना मोहून टाकले. व आता दगडातून सुद्धा या मराठमोळ्या माणसाने आपल्या कलेतून देवपण आणले आहे. तसेच कोरोना माहामारीतून वाचवायला कवी सुद्धा बनले व अनेक काव्याची रचना सुद्धा या ईश्वरी अंश दिलेल्या कलाकाराने सर्वाना खूप कलेबद्दल आवड जोपासा, असा संदेश देत सुखद धक्का दिला आहे तरी यांच्या कला आपण भोईचे केरवडे गावी जाऊन नक्की एकदा प्रत्यक्षात पाहूयात.

या आहेत त्यांच्या काही रचना

कोरोनाचा असुर मातला कशी ही मात करावी
हैराण झाली दुनिया सारी घडली अजब कहाणी ।।धृ।।
नाही राहिली नातीगोती संकटा आले उधाण
गजानना तू आवरी आता कोरोनाचे थैमान
या रोगावर औषध म्हणूनि घ्या स्वतःची काळजी ।।1।।
आली आपत्ती कोरोनाची देवा तूंचि सांभाळी
देवा तुझी लीलाही न्यारी या असुरा संहारी
संकट आले जगतावरी या तू अमुचा कैवारी ।।2।।

नाही राहिला या कलियुगी संबंध कुण।शी कुणाचा भरकटले सारे जग हे माणूस वैरी माणुसकीचा। नात्यामध्ये पडली दरी ही कशी बूजेल आता। आई बाप अन बंधू भगिनी कोण कुणाची कांता या जगामध्ये पटले आता कोणी नाही कुणाचा ।।1।। स्वार्थापोटी तुटली सारी रक्ताची ही नाती। कशा जुळतील संसारातील समईच्या त्या वाती तारील सर्वा लंबोदर हा करू धावा गजाननाचा ।।2।।

कोरोनासूर हा दैत्य मातला
घेई त्याचा ठाव रे
गजानना धाव रे गजानना पाव रे ।।धृ।।
त्रस्त झाले जग हे सारे
जीणे नकोसे केले
कामधंदा सोडूनि सर्वा घरामध्ये बसविले
गजानना तू या सर्वांची पैलतीरी ने नाव रे ।। 1 ।।
हीच विनवणी अमुची देवा
नेई उध्दरुनि तू सकलांना
शरण आलो तुझिया चरणा
ठेवी कृपेचा हस्त रे
तू सुखकर्ता तू दुखहर्ता हाच अमुचा भाव रे ।।2।।

कृपा करी गे तारी आता
आई माय भवानी आई माय भवानी
अंबे आलो तुझ्या दरबारी ।।धृ।।
छळीले येथे कोरोनाने ग्रासीले जगाला
नष्ट कराया महामारीला खड्ग धरी हाता
तू विश्वाला तारी आता रोखूनि महामारी ।।1।।
कोरोनाची भीती दाटली प्रत्येकाच्या मना
आई भवानी प्रकट होऊनि पूर्ण करी कामना
सिंहावरती बैसोनिया कोरोनासूर संहारी ।।2।।
पावणाईच्या रूपे प्रकटली प्रत्येकाच्या गावा
कोरोनाचे थैमान आवरी आई आता
उजाड झाले कित्येकांचे संसार सावरी ।।3।।

भजन किर्तन करण्यामागे हाचि एक स्वार्थ रे
समाज प्रबोधन व्हावे हाचि याचा एक अर्थ रे।।
गरजे पुरता स्वार्थ नसावा असाही याचा अर्थ रे
अर्थाशिवाय काहीही करावे ते सारे व्यर्थ रे ।।1।।
जन्मा आपण का आलो याला सुद्धा अर्थ रे
जन्मा आला नि वाया गेला याला काय अर्थ रे ।।
समाजाचेही देणे लागतो या जन्माचा अर्थ रे ।।2।।
मानव जन्मा येऊनि भले करावे जन्म होईल सार्थक रे
सुखी व्हावे जग हे सारे याचा तो मतीतार्थ रे ।।
आर्त विनवणी अमुची देवा पूर्ण व्हावी हाच स्वार्थ रे ।।3।।

बाळू ठाकूर,

भोईचे केरवडे तर्फ माणगाव

मो.7588864229

प्रतिक्रिया व्यक्त करा