You are currently viewing ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते वामन खंडोजी राणे यांचे निधन

ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते वामन खंडोजी राणे यांचे निधन

झाराप (कुडाळ)प्रतिनिधी :

झाराप येथील रहिवासी तसेच शिवराज मराठा विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (साळगाव) चे सेवानिवृत्त पर्यवेक्षक ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते वामन खंडोजी राणे (वय ८४) यांचे सोमवारी रात्री रेडी येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. बुधवारी सकाळी १०.०० वाजता सावंतवाडी येथील उपरलकर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द हे त्यांचे मूळ गाव. तेथूनच त्यांनी आपली अध्यापकीय सेवा सुरू केली होती. हरकुळ येथील एक वर्षाच्या सेवेनंतर ते साळगावातील शिवराज मराठा माध्यमिक विद्यालयात शिक्षकी पेशामध्ये रुजू झाले. साळगाव येथे इंग्रजी विषयाचे अध्यापन त्यांनी प्रदीर्घकाळ केले व विद्यालयाचे पर्यवेक्षक म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते. साळगाव येथील गुरु ग्रंथालयाची धुरा देखील त्यांनी काही काळ सांभाळली होती. शिवणकामही त्यांना अवगत होते. वामन राणे गेले काही दिवस आजारी होते. रेडी येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

त्यांच्या पश्चात पत्नी आशालता राणे, मलेशिया येथे प्रोजेक्ट इंजिनियर असलेले मुलगे प्रदीप राणे, फिल्म इंडस्ट्रीमधील कला दिग्दर्शक संजीव राणे, पशुवैद्यकीय अधिकारी योगेश राणे, अभियंता विनायक राणे, सिद्धेश राणे सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 2 =