वैभववाडी तालुका आरोग्य अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल

वैभववाडी

मोबाईल व्हॉट्सअपवरुन महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला अश्लील मेसेज पाठवून मनाला लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केल्याप्रकरणी वैभववाडी तालुका अधिकारी डॉ. उमेश पाटील यांच्याविरोधात वैभववाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २४ एप्रिल ते १४ जुलै दरम्यान घडली होती. दरम्यान या घटनेची नोंद गुरुवारी पोलिसात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील हे फिर्यादी महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या मोबाईल व्हाट्सअपवरती गेले अनेक महिने वारंवार मनात लज्जा उत्पन्न होईल असे मेसेज पाठवत होते. तसेच तिला वैभववाडी येथील आपल्या ऑफिसमध्ये बोलावून घेऊन आपल्या सोबत गोव्याला फिरायला का येत नाहीस असे बोलून तिच्या हाताला पकडून पाठीवर हात फिरवून जबरदस्ती करण्याचा गेले सहा महिने वारंवार प्रयत्न करीत असत.
तसेच महिला डॉक्टरला नेहमी सायंकाळी ५ वाजल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी आपले कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर महिला डॉक्टरला मोबाईलवरुन चहा पिण्याच्या निमित्ताने बाहेर किंवा आपल्या जवळ या व मॅगी किंवा चहा बनवून दे असे नेहमी बहाने करून माझ्याशी अश्लील चाळे करत असत याबाबत आरोपीने तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उमेश पाटील यांच्याविरोधात भा. द. वी. कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास महिला पोलीस हवालदार प्रीती शिंगारे करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 12 =