You are currently viewing खासदार नारायण राणे यांची आघाडी सरकारवर मिश्किल टिप्पणी…

खासदार नारायण राणे यांची आघाडी सरकारवर मिश्किल टिप्पणी…

भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली त्या बैठकीत केंद्र सरकारने गोरगरिबांसाठी राबविलेल्या योजनांची माहिती तळागाळात पोचविण्याबाबत मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद झाली.यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यपद्धती वर मिश्किल शब्दात टिपण्णी केली.
सोबत माजी मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार डॉ. निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकारला खाली खेचण्यासाठी आणि शिवसेनेला जिल्ह्यातून तडीपार करण्यासाठी भाजपाने योजनाबद्ध कार्यक्रम आखला असून त्याची अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगितले. शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार जिल्ह्यात येऊन गेले, त्यांनी दिलेल्या आश्वासनांची राणे यांनी खिल्ली उडवली. महसूल राज्यमंत्र्यांना काय अधिकार असतात? असा प्रश्न उपस्थित करून कबूलयातदार गावकार प्रश्न १५ दिवसात सोडविणार आहेत तर मग तो इतकी वर्षे का रखडला? कॅबिनेट मध्ये आणला का? गावकार मंडळींनी ज्या कोर्ट केसेस केलेल्या आहेत त्यांचं काय? असे अनेक प्रश्न उपस्थित करून महसूल मंत्र्यांचे आश्वासन ते औरंगाबाद येथे गेल्यावर विसरून जातील अशीही कोपरखळी मारली.
शिवसेनेचे कोकणात ११ आमदार असूनही विकास होत नाही या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना ११ आमदारांना पाटबंधारे, शाळा, जाहीर केलेला फंड, सी वर्ल्ड सारख्या प्रकल्पांवर बोलता येत नाही. ते विकास काय करणार? जिल्ह्याचा विकास होण्यासाठी भाजपाच्या वतीने सरकार विरुद्ध आंदोलने करणार असे त्यांनी सांगून पत्रकार सरकारला झोडत नाहीत म्हणून जिल्ह्याचा विकास होत नसल्याचे म्हणाले.
जिल्ह्यात मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी केंद्र सरकारच्या एमसीआय ची परवानगी लागते. राज्य सरकारला अधिकार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मध्ये निर्णय घेतला परंतु मेडिकल कॉलेजसाठी जमीन, येणारी ६५० कोटी रुपयांचा खर्च, सरकार देणार काय? जिल्हासाठीच निधी देत नाहीत ते वैद्यकीय कॉलेजसाठी निधी देणार का? असे विचारून सरकारच्या निर्णयाचीच पोलखोल केली. चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असून, भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार असे सांगत हे फक्त गणपती आणणार आणि आता गणपती घरात बसले अशी हसत हसतच माजी पालकमंत्र्यांवर टीका केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − 8 =