You are currently viewing नुकसानीच्या पंचनाम्यासाठी कुडाळ, कणकवली मधील महसूल कर्मचारी मालवणात होणार दाखल

नुकसानीच्या पंचनाम्यासाठी कुडाळ, कणकवली मधील महसूल कर्मचारी मालवणात होणार दाखल

आ. वैभव नाईक यांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली मान्य

जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, आमदार यांची मालवण वीज वितरण कार्यालयाला भेट

मालवण वीज वितरण कार्यालयात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या समवेत आमदार वैभव नाईक यांनी आज भेट देऊन महावितरणच्या नुकसानीचा आढावा घेतला. वीज पुरवठ्या संदर्भात सद्य स्थितीची माहिती घेण्यात आली. दोन दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत करण्याबाबतचे नियोजन करण्यात आले. मालवण येथे नुकसानीचे पंचनामे करण्यास उशिर होत आहे.त्यामुळे लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कुडाळ व कणकवली येथून महसूल कर्मचारी उपलब्ध करण्याची मागणी आ. वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, व प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांच्याकडे केली हि मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली आहे. उद्यापासून मालवण मध्ये कुडाळ व कणकवली मधील महसूल कर्मचारी दाखल होणार आहेत.

मालवण तालुक्याच्या किनारपट्टीसह ग्रामीण भागात तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले. झाडांची पडझड झाल्याने स्थानिक नागरिकांच्या राहत्या घरांचे नुकसान झाले. या वादळामुळे मालवण तालुक्यामध्ये 450 विजेचे खांब पडून वीजवितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन वीज प्रवाह खंडित झाला आहे. याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. मालवण मध्ये वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी परभणी वरून एक टीम दाखल झाली आहे.मालवण शहराबरोबरच तालुक्यातील विजेच्या कामांना सुरुवात झाली आहे. दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

यावेळी वीज वितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, उपअभियंता श्री. साखरे,तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक यतीन खोत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + eighteen =