You are currently viewing मडूरा व सातार्डा जीर्ण पुलांसाठी पुकारलेले बेमुदत उपोषण जि.प.अध्यक्ष संजना सावंत यांच्या ठोस अश्वासनामुळे स्थगित

मडूरा व सातार्डा जीर्ण पुलांसाठी पुकारलेले बेमुदत उपोषण जि.प.अध्यक्ष संजना सावंत यांच्या ठोस अश्वासनामुळे स्थगित

मडूरा (माऊली मंदिर) व सातार्डा (घोगळवाडी) येथील ४० वर्षे जुने झालेले जीर्ण पुलांचे नव्याने बांधकाम करण्यासाठी मडूरा दशक्रोशी संघर्ष समितीच्या वतीने गेले तीन वर्षे अर्ज,विनंत्या व निवेदने देऊनही संबंधित विभागाने दखल न घेतल्याने अखेर सोमवार दि.२६ जुलै २०२१ रोजी या पुलांसाठी समिती अध्यक्ष जगन्नाथ पंडित यांच्या नेतृत्वाखाली मडूरा येथे बेमुदत उपोषणाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी या मतदार संघाच्या सदस्या व महिला व बालकल्याण सभापती सौ.शर्वाणी शेखर गावकर यांनी तात्काळ उपोषणस्थळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.संजना सावंत,सावंतवाडी पं.सं सभापती सौ.निकिता सावंत,सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह दाखल होऊन उपोषणास बसलेल्या संघर्ष समितीचे अध्यक्ष जगन्नाथ पंडित यांच्याकडून त्यांच्या मागण्या ऐकून घेऊन घेतल्या.
यावेळी भरपावसात जि.प. अध्यक्षांनी त्या पुलाची पाहणी करून सदर विषय खूपच गंभीर असून,त्यांची मागणी रास्त असल्याचे सांगून, याबाबत शुक्रवार दि.३० जुलै २०२१ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाची ओरोस येथे विशेष बैठक घेऊन तोडगा काढला जाईल असे ठोस आश्वासन देऊन उपोषणकर्त्याना उपोषण मागे घेण्याची विनंती केली,त्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.त्यामुळे मडूरा दशक्रोशीतील नागरिकांचे शुक्रवारी होणाऱ्या बैठकीकडे लक्ष लागले आहेत.
यावेळी भाजपचे सावंतवाडी उपाध्यक्ष शेखर गावकर, मडूरा सरपंच साक्षी तोरसकर,रोणापाल सरपंच सुरेश गावडे,सातोस सरपंच बबन सातोसकर,पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोसकर,मडूरा उपसरपंच विजय वालावलकर, निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे,भिकाजी धुरी,ग्रा.पं.सदस्य सखाराम परब,माजी सरपंच आनंद परब,मडूरा शिवसेना शाखाप्रमुख श्रीकृष्ण भोगले,रवींद्र धुपकर,आपा पारिपत्ये व शेकडी नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + 17 =