अविनाश पराडकर यांची भाजपा सोशल मीडिया प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्ती!

अविनाश पराडकर यांची भाजपा सोशल मीडिया प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्ती!

कोकण विभाग सहसंयोजक पदाची जबाबदारी घोषित!!

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडियाची कार्यकारिणी निश्चित करण्यात आली असून भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक अविनाश पराडकर यांची नियुक्ती कोकण विभाग सहसंयोजक पदी करण्यात आली आहे. भाजपा सोशल मीडिया प्रदेश संयोजक प्रवीण अलई यांनी सोशल मीडिया प्रदेश कार्यकारिणी -२०२० घोषित केली आहे. यात सहसंयोजक, विभाग संयोजक/सहसंयोजक, समन्वयक, कायदेशीर सल्लागार प्रमुख/सहप्रमुख, कंटेंट टीम प्रमुख/सहप्रमुख व प्रदेश सदस्य अशा एकूण ५९ जणांची घोषणा प्रदेशाच्या कार्यकारिणीत करण्यात आली आहे.

अविनाश पराडकर यांनी सोशल मीडियातून भाजपाची भूमिका नेहमीच प्रभावीपणे मांडली. लॉकडाऊन काळात झालेल्या पक्षाच्या व्हर्च्युअल सभा सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वीपणे घेऊन त्यांनी पक्षाचे लक्ष वेधले होते. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये अलीकडेच झालेल्या पक्षाच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष मा.राजन तेली, माजी आमदार अजितराव गोगटे, माजी जिल्हाध्यक्ष मा.अतुल काळसेकर, संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत प्रदेश सरचिटणीस मा.आम.रविंद्रजी चव्हाण यांच्याहस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला होता. त्याचवेळी त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याचे निश्चित करण्यात आले होते. कोकण विभाग सहसंयोजक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जोरदार अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा