You are currently viewing पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजानी केलेल्या सुधारणा सिंधुदुर्गाच्या विकासाला पूरक ठरल्या

पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजानी केलेल्या सुधारणा सिंधुदुर्गाच्या विकासाला पूरक ठरल्या

के. मंजूलक्ष्मी – जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग

सावंतवाडी

सावंतवाडी संस्थानचे भूतूपूर्व अधिपती पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची ८५ वी पुण्यतिथी श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे साजरी करण्यात आली ‍.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोसले तर प्रमुख अतिथी म्हणून के मंजूलक्ष्मी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग जयंत जावडेकर मुख्याधिकारी सावंतवाडी नगरपरीषद उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर संस्थांनचे राजगुरू भारती महाराज, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त लखम सावंत भोसले , युवराज्ञी श्रद्धा राजे भोसले ,संस्थेचे संचालक प्राध्यापक डी टी देसाई , सहसंचालक अॅड. श्यामराव सावंत ,सदस्य डॉ सतीश सावंत, श्री जयप्रकाश सावंत तसेच संस्थेचे अनेक पदाधिकारी कार्यक्रमासाठी उपस्थित होते .

कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक बापूंसाहेब महाराजांच्या प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने झाली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल यांनी केले त्यांनी सांगितले की महाविद्यालयाचा निकाल हा ९५ टक्केपेक्षा नेहमीच जास्त असतो. या महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये मदर क्वीन्स इंग्लिश मिडीयम स्कूल हे केजीपासून दहावीपर्यंतची इंग्रजी माध्यमाची शाळा, राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले कनिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स तर श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या माध्यमातून बीए ,बीएस्सी, बीकॉम पासून पदव्युत्तर अभ्यासक्रमाबरोबरच पीएचडीपर्यंतचे शिक्षण देणारी ही संस्था आहे . त्याचबरोबर श्री पंचम खेमराज लॉ कॉलेजच्या माध्यमातून कायद्याचं शिक्षणसुद्धा या कॅम्पसमध्ये दिलं जातं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य महाविद्यालय म्हणून या महाविद्यालयाची ओळख आहे .पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचा जीवन परिचय प्रा . एम .व्ही भिसे यांनी करून दिला. याप्रसंगी ‘खेमराज ीय ‘ या महाविद्यालयाच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
प्रमुख अतिथी श्री जयंत जावडेकर, मुख्याधिकारी सावंतवाडी नगरपरीषद यांनी पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांनी सावंतवाडी शहराच्या जडणघडणीमध्ये दिलेले योगदान आणि त्यामुळेच सावंतवाडी शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे अनेक सुधारणा त्या काळामध्ये बापूसाहेब महाराजांनी सावंतवाडी शहरात केल्या नगरपालिकेची स्थापना बापूसाहेब महाराजांनी त्या वेळी केलेली होती.स्टेट बँकेची स्थापना केलेली होती.जानकीबाई सूतिकागृह अशा अनेक सुधारणा त्यावेळी त्यांनी या शहरांमध्ये केल्या त्यामुळेच आज हे शहर सिंधुदुर्गमध्ये आपलं वेगळेपण ठेवून आहे .महात्मा गांधींनी पुण्यश्लोक बापूसाहेबाना रामराजा व सावंतवाडी संस्थांनला रामराज्य असं संबोधित केले .डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी एक न्यायप्रिय राजा असे बापूसाहेब महाराजांचे वर्णन केले .सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी आवर्जून उल्लेख केला की सावंतवाडी संस्थानाने व त्यावेळच्या राजांनी या संस्थांमध्ये शैक्षणिक सुधारणा घडवून आणल्या. शाळा सुरू केल्या शिक्षणासाठी मोठा खर्च केला त्यामुळेच येथील सर्वसामान्य जनतेला उच्च शिक्षण घेता आले .आज हे महाविद्यालय पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांच्या नावाने आहे व अतिशय प्रगतीपथावर आहे हे बघून खूप आनंद झाला. त्या स्वतः केरळमधील राजघराण्याने सुरू केलेल्या कन्या महाविद्यालयामध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले याची माहिती त्यांनी आवर्जून दिली .
तुम्हाला जर बदल हवा असेल तर स्वतःपासून सुरू करा असे महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे त्यानुसार विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मेहनत घ्यायला हवी , स्वत मध्ये बदल करायला हवा तरच तुमच्या करिअरचे मार्ग हे मोकळे होतील व आपण उच्च पदावर जाल .कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोसले तथा राजेसाहेब यांनी अध्यक्षपदावरून बोलताना राजघराण्याचा इतिहास सांगितला . ज्यामध्ये पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांचं शैक्षणिक कार्य श्रीमंत शिवरामराजे भोसले, राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले यांनी शैक्षणिक विकासाला गती दिली योगदान दिले यामुळेच येथील लोकांना विज्ञान पदवी मिळवता आली याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला .याप्रसंगी अकरावी आर्ट्स कॉमर्स सायन्स मध्ये प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री पाडगावकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएच डी शिक्षण पूर्ण केले याबद्दलही त्याचा सत्कार करण्यात आला .मोरेश्वर पोतनीस यांनी पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांवर पोवाडा सादर केला .या कार्यक्रमासाठी सावंतवाडी दोडामार्ग परिसरातून पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज व सावंतवाडी संस्थानवर प्रेम करणारे अनेक जण उपस्थित होते यामध्ये श्री वसंत केसरकर अन्वर खान , रेश्मा सावंत सदासेन सावंत ,प्रेमानंद देसाई नकुल पार्सेकर ,सुभाष देसाई भगवान देसाई ,अच्युत सावंत भोसले ,सुरेश गवस, मधुकर देसाई ,सूर्याजी देसाई ,पंचम खेमराज लॉ कॉलेजच्या प्राचार्या सौ अश्विनी लेले , मदर क्वीन्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ अनुजा साळगावकर व त्यांच्या सर्व
सहकारी शिक्षकांसोबत उपस्थित होत्या महाविद्यालयाचा प्राध्यापकवर्ग शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ कविता तळेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. यू आर पवार यांनी केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − four =