You are currently viewing नेरूर,माणगाव,महादेवाचे केरवडे गावातील अनेक विकास कामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

नेरूर,माणगाव,महादेवाचे केरवडे गावातील अनेक विकास कामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

नेरूर शिरसोसवाडीतील अंगणवाडी इमारतीचे केले उदघाटन

ग्रामस्थांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायत हद्दीतील सहा महसुली गावांमध्ये नळपाणी योजनेसाठी ४ कोटी २५ लाख रु निधी मंजूर करण्यात आला आहे.या नेरूर गोंधयाळे येथील नळपाणी योजनेचे भूमिपूजन तसेच डोंगरी विकास निधी अंतर्गत १२ लाख ३० हजार रु निधीतून नेरूर शिरसोसवाडी येथे अंगणवाडी इमारत बांधण्यात आली असून या इमारतीचे उदघाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच माणगाव भटवाडी चंद्रकांत कोणकर यांच्या घरापासून गिरोबा मंदिर पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ४ लाख, माणगाव अंबिका बाबली धुरी यांच्या शेतजमिनीतून जाणारा रस्ता डांबरीकरण निधी ४ लाख, माणगाव पेडणेकरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ४ लाख, माणगाव खालची बेनवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे हि कामे देखील मंजूर करण्यात आली आहेत. त्याचबरॊबर जल जीवन मिशन अंतर्गत महादेवाचे केरवडे गावात नळपाणी योजनेसाठी ८४ लाख ६३ हजार रु मंजूर करण्यात आले आहेत या सर्व कामांची भूमिपूजने आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सोमवारी करण्यात आली. ग्रामस्थांची मागणी असलेली हि कामे मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.

याप्रसंगी नेरूर येथे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, रुपेश पावसकर, सरपंच भक्ती घाडी, उपसरपंच दत्ता म्हाडदळकर,माजी सरपंच शेखर गावडे,माजी उपसरपंच समद मुजावर, ग्रा. प सदस्य प्रभाकर गावडे, अरुण चव्हाण, निकिता सडवेलकर, मंजुनाथ फडके, कुडाळकर, शंभू नाईक, अण्णा गवाणकर, मंगेश राऊत, जगन्नाथ गावडे, रामा कांबळी, अजित मार्गी, प्रसाद गावडे, प्रभाकर गावडे, पपी गावडे, पिंटू गावडे, बाळा राऊत,विजय लाड, विनय गावडे, काका गावडे, सुमित गावडे, अजित मसुरकर आदी
माणगाव येथे उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, माजी जि.प.सदस्य राजू कविटकर, विभागप्रमुख बंड्या कुडतरकर, सरपंच मनीषा भोसले, कौशल जोशी, बापू बागवे, अजित करमलकर, वैभव परब,संदीप सावंत,अनुष्का तेली,तुकाराम परब, सुधीर राऊळ, मनाली धुरी, बाळा जोशी, सागर कुडतरकर,रमेश हळदणकर, यशवंत कदम,अनिल बागवे,तेजस्विनी नाईक आदी
महादेवाचे केरवडे येथे घावनळे विभागप्रमुख रामा धुरी,माजी उपसभापती श्रेया परब, तुषार परब, निलेश सावंत,ऍड किशोर शिरोडकर,स्वरा परब,प्रकाश कविटकर,मिलिंद जाधव, सचिन कविटकर,शशी हेवाळेकर आदी शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा