You are currently viewing राष्ट्रवादी पदवीधर संघाचा कार्यक्रम संपन्न

राष्ट्रवादी पदवीधर संघाचा कार्यक्रम संपन्न

कुडाळमध्ये जिल्हाध्यक्ष सामंत यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम

कुडाळ

राष्ट्रवादी कॉंग्रेस पदवीधर संघाचा कार्यक्रम  कुडाळ येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग धुरी, पदवीधर संघ सावंतवाडी तालुकाध्यक्ष प्रसाद दळवी, काका कुडाळकर, नाझिर शेख, भास्कर परब आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी पदवीधर संघाच्या सावंतवाडी शहर अध्यक्ष पदी रवी चव्हाण यांची तर मालवण तालुकाध्यक्ष पदी सदमा खटखटे तर जिल्हा उपाध्यक्ष पदी अनिता फर्नांडिस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + nine =