You are currently viewing विजय मर्चंट स्पर्धेसाठी सावंतवाडीच्या एम क्रिकेट अकॅडमीचा विश्वनाथ रेगेची निवड

विजय मर्चंट स्पर्धेसाठी सावंतवाडीच्या एम क्रिकेट अकॅडमीचा विश्वनाथ रेगेची निवड

सावंतवाडी:

 

सावंतवाडीतील विश्वनाथ उर्फ पप्पू रेगे या खेळाडूची विजय मर्चंट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या १६ वर्षांखालील खेळाडूंच्या शिबिरासाठी निवड करण्यात आली असून तो शनिवारी या शिबिरासाठी पुणे येथे रवाना झाला.

सावंतवाडीतील एम क्रिकेट अकॅडमीचा विश्वनाथ हा खेळाडू आहे. महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन ने घेतलेल्या १६ वर्षाखालील खेळाडूंच्या इन्व्हिटेशन लीगमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधित्व करताना विश्वनाथ रेगे यांनी केलेली कामगिरी तसेच सुपर लीग मधील सामन्यातील त्याच्या कामगिरीमुळे त्याची या शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे.

सावंतवाडीतील मिलाग्रीज हायस्कूलचा विद्यार्थी असलेला विश्वनाथ उर्फ पप्पू रेगे हा सावंतवाडीतील एम क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू असून त्याला प्रशिक्षक पीटर सर, नागेश रेगे, अविनाश जाधव, जॅक अल्मेडा यांचे मार्गदर्शन लाभले. विश्वनाथच्या या निवडीबद्दल एम अकॅडमीचे अध्यक्ष उदय नाईक, उपाध्यक्ष तथा बांदा सरपंच अक्रम खान त्याचे सर्व प्रशिक्षक व सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी यांनी त्याचे अभिनंदन करत त्याला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − eight =