You are currently viewing सावंतवाडी शहरात एक हजार वृक्ष लागवड करणार…

सावंतवाडी शहरात एक हजार वृक्ष लागवड करणार…

पालिकेचा संकल्प; उपक्रमाचा आजपासून शुभारंभ…

सावंतवाडी

येथील नगरपालिकेने यावर्षी पावसाळ्यात एक हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे. दरम्यान या उपक्रमाचा शुभारंभ आज प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या हस्ते करण्यात आला. येथील सर्वोदय नगर परिसरात पालिकेच्या जागेत हे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर, उद्यान पर्यवेक्षक गजानन परब, डॉ. चिंडक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरातील पालिकेच्या मालकीच्या जागेत जांभूळ, जाम, दालचिनी आदींसारखी झाडे लावण्यात आली. दरम्यान १ हजार वृक्ष लागवड होइपर्यंत ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा