You are currently viewing मळेवाड येथील तीस वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या

मळेवाड येथील तीस वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या

सावंतवाडी

मळेवाड येथील तीस वर्षीय युवकाने घराशेजारील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना काल रात्री उशिरा उघडकीस आली. राजेश प्रभाकर केरकर (रा. केरकरवाडी), असे त्याचे नाव आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरोंदा दूरक्षेत्रच्या पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मात्र राजेशच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजेश याचा मृतदेह काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घराशेजारील एका झाडावर गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. दरम्यान याबाबतची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिल्यानंतर आरोंदा दूरक्षेत्रच्या पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तसेच मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. राजेशच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + eight =