You are currently viewing फोंडाघाट मध्ये श्रीरामनवमी उत्साहात

फोंडाघाट मध्ये श्रीरामनवमी उत्साहात

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये आज श्रीराम नवमी निमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे श्री.पाचोबा देवस्थान आणि हवेली नगर साई मंदिर या ठिकाणीही कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दोन्ही ठिकाणी भव्य कार्यक्रम आयोजित करून आकर्षक बक्षीस योजना शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री.संजय आग्रे यांच्या माध्यमातुन देण्यात येणार आहे श्री.पाचोबा मंदिर याठिकाणी बरीच वर्ष या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. हवेली नगर श्री.साई मंदिरात दोन्ही ठिकाणी दुपारी महा भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. श्री.विठ्ठल मंदिर या ठिकाणी पाळणा बांधुन श्रीराम नवमी निमीत्त विविध पारंपारीक कार्यक्रम करण्यात आले. आज फोंडाघाट वासीय मोठ्या प्रमाणात रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रमात सामील झाले. सर्व मंदिरात विद्युत रोशनाई आणि फुलांची लक्षणिय सजावट करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा