You are currently viewing सिंधुदुर्गात मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाला उद्यापासुन सुरुवात

सिंधुदुर्गात मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाला उद्यापासुन सुरुवात

“विनोद सांडव यांची माहिती;”

कणकवली-तेलीआळी येथे उद्या सकाळी १०.०० वाजता होणार शुभारंभ……!!

मालवण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला उद्यापासून सुरुवात होणार आहे.दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचा शुभारंभ उद्या दि.१४ मार्च रोजी १०.०० वा कणकवली-तेलीआळी येथील मनसेच्या कार्यालयात माजी आमदार तथा सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा सदस्य नोंदणी अर्ज भरुन होणार आहे.याबाबतची माहिती मनसेचे मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.तरी तालुक्यातुन उपतालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष,उपशहराध्यक्ष,
विभागअध्यक्ष,उपविभागअध्यक्ष,शाखाध्यक्ष,उपशाखाध्यक्ष,राजदूत (गटअध्यक्ष) अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी तसेच सर्व आजी-माजी पदाधिकारी यांनी वेळीच उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा