You are currently viewing सामाजिक बांधिलकीने निराधार वृद्ध महिलेला मिळवून दिला सविता आश्रमचा आधार

सामाजिक बांधिलकीने निराधार वृद्ध महिलेला मिळवून दिला सविता आश्रमचा आधार

सावंतवाडी

खासकीलवाडा येथील निराधार नलिनी पाटणकर वय वर्ष 65 हिला आज सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांकडून पणदूर येथील सविता आश्रम मध्ये दाखल करण्यात आले. वयोवृद्धामुळे सदर वृद्ध महिला फार थकली होती. दोन वेळेचे जेवणही मिळणे तिला कठीण होऊन गेले होते. तिचे सतत होणारे हाल पाहून तेथील व्यावसायिक सदानंद पवार यांनी याची माहिती सामाजिक बांधिलकीला दिली होती.त्यावेळी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी तत्काळ दाखल होऊन सर्व परिस्थितीची माहिती घेतली व ती माहिती सविता आश्रम चे संस्थापक संदीप परब यांना कळवली असता परब यांनी सदर महिलेला आश्रम मध्ये लगेच घेऊन यायला सांगितले. त्यानंतर सामाजिक बांधिलकी कडून सदर महिलेचा रीतसर बॉण्ड पेपर करून घेतला गेला व त्यानंतर सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी व तेथील व्यावसायिक सदानंद पवार यांनी लोकवर्गणीतून दहा हजार रुपये जमा केले व सामाजिक कार्यकर्ते ॲम्बुलन्स मालक हेमंत वागळे व लक्ष्मण शिरोडकर यांच्या सहकार्याने सदर महिलेला ॲम्बुलन्स मधून सविता आश्रम मध्ये सोडण्यात आले.जमलेली दहा हजार रुपयाची रक्कम त्या वृद्ध महिलेच्या वतीने सविता आश्रमला सुपूर्द करून पावती घेतली. सदर निराधार वृद्ध महिलेचे उर्वरित जीवन सविता आश्रम मुळे सुखमय जाणार आहे यात वाद नाही. या सामाजिक कार्यासाठी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव, समीरा खलील, संजय पेडणेकर, शेखर सुभेदार, प्राध्यापक सतीश बागवे , लक्ष्मण शिरोडकर तसेच व्यावसायिक सदानंद परब यांनी पुढाकार घेतला. यावेळी सविता आश्रम चे व्यवस्थापक लवू सावंत व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + four =