You are currently viewing मोचेमाड समुद्रकिनारी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ

मोचेमाड समुद्रकिनारी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ

वेंगुर्ले

वेंगुर्ले तालुक्यातील मोचेमाड समुद्रकिनारी सायंकाळी पुरुष जातीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मोचेमाड येथील सागर रक्षक खवणेकर यांना आज सायंकाळी समुद्रकिनारी मृतदेह आढळल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात माहिती दिली असता पोलीस उपनिरीक्षक केसरकर, पोलीस योगेश वेंगुर्लेकर, पोलीस सराफदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सदर अनोळखी व्यक्तीचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेला असून त्यांच्या अंगावर पिवळ्या रंगाचा शर्ट व हाफ पँट आहे. मात्र पाण्यामध्ये माशांनी मृतदेह खाल्ल्याने तो कुजलेल्या स्थितीत आहे. पोलिसांनी पंचनामा करून सदर मृतदेह शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवागृहात ठेवला आहे. या मयत व्यक्ती बाबत कोणाला काहीही माहिती असल्यास त्यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा