You are currently viewing चालताना एकवार
Oplus_16908288

चालताना एकवार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी दुर्गादास पळसकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”चालताना एकवार”*

***************

 

चालताना एकवार

वळून पाहिले तू मला

रातराणीच्या फुला रे

दिल कुर्बान केले मी तुला/ध्रु/

चारुगात्रे देखोनी तुला

घायाळलो रे मी प्रीती फुला

विसरुनी गेलो क्षणभरी मी

मज तू सावरुनी जा मला/

“सुहास्य वदन तू करी

गाली खळी शोभे तुला

कुणी तुजसी निर्मिले

किती सुंदर असेल तो भला”/

गंध तुझ्या तिपेडीचा

मी मंद मंद धुंद श्वासीला

निमिषार्ध पापणी तुझी झुके

शर हृदयी तिने मज मारीला/

“चाल तुझी गजगामिनी

वेड लाविले तिने मला

प्रणयात धुंदीची उधळण करी

मोहिनी ती घाले मला”/

स्वागते पदपथी तुझ्या मी

“जाई जुई मोगरा” रेखीला

यावे आता तू प्रिये

आइ मिलन की बेला/

 

कवी दुर्गादास दि. पळसकर पुणे

भ्रमणध्वनी क्र.7387923895

प्रतिक्रिया व्यक्त करा