You are currently viewing मळगाव घाटीच्या खोल दरीत कोसळली इको कार ; गवारेडा आडवा आल्याने अपघात

मळगाव घाटीच्या खोल दरीत कोसळली इको कार ; गवारेडा आडवा आल्याने अपघात

सावंतवाडी
सावंतवाडी शिरोडा मार्गावरील घाटीत रस्त्यालगतच्या सुरक्षा गार्ड तोडून एक मारुती इको कार १०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. सावंतवाडी शहरातील गौरव चंद्रशेखर नाईक व त्यांचे कुटुंबिय जत्रेतुन सावंतवाडी शहरात परतत असताना घाटात अचानक गवारेडा आडवा आल्याने गाडी बाजूला घेतली. त्यामुळे रस्ता सोडून ही गाडी घाटात कोसळली. मात्र सुदैवाने गाडीतील सर्व प्रवासी बालबाल बचावले. चारच्या सुमारास हा अपघात घडला. याबाबतची माहिती पोलीस कॉन्स्टेबल राजेश गवस यांनी दिली आहे. अधिक तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =