You are currently viewing वेंगुर्ला नगरपरिषदेकडून थकबाकीदारांवर जप्‍तीची कारवाई…

वेंगुर्ला नगरपरिषदेकडून थकबाकीदारांवर जप्‍तीची कारवाई…

वेंगुर्ला नगरपरिषदेकडून थकबाकीदारांवर जप्‍तीची कारवाई…

शहरातील आठ मालमत्ता सिल

वेंगुर्ले

वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या कर विभागाकडून मालमत्‍ता थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्‍यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ८ मालमत्ता सील करण्‍यात आलेल्‍या आहेत. वेंगुर्ला शहरात निवासी, बिगर निवासी, मिश्र व औदयोगिक अशा एकूण ६५५३ नोंदणीकृत मालमत्‍ता आहेत. वेंगुर्ला नगरपरिषदेकडून वारंवार आवाहन करुन ही कर न भरणा-या थकबाकीदारांच्‍या मालमत्‍ता सील करण्‍याची मोहीम हाती घेण्‍यात आलेली आहे.

दरम्यान १ मार्च पासून पुढील कालावधीत ज्‍या मालमत्‍ताधारकांचा मालमत्‍ता कर थकीत आहे अशा मालमत्‍ता ३१ मार्चपर्यंत सील करण्‍यात येणार असून शहरातील मालमत्‍ताधारकांना मागणी बिले यापूर्वीच वाटप केलेली असल्‍याने कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. असे प्रशासनाकडून स्‍पष्‍ट करण्‍यात आलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × five =